NEET Paper Leak : NEET पेपर घोटाळ्यात मोठी अपडेट! लातूरमधील 9 विद्यार्थी संशयाच्या भोवऱ्यात; काय आहे कारण?

Last Updated:

NEET Paper Leak : नीट पेपर घोटळ्यात लातूरमधून एक मोठी अपडेट समोर आली आहे. लातूरमध्ये आतापर्यंत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नीट प्रकरणात लातूरमधील 9 विद्यार्थी?
नीट प्रकरणात लातूरमधील 9 विद्यार्थी?
लातूर : वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीची प्रवेश परीक्षा नीट (NEET) पेपर घोटाळ्याची पाळेमुळे देशभर पसरल्याचं येतंय. या प्रकरणाची विविध राज्यांमध्ये चौकशी सुरू आहे. महाराष्ट्रातील लातूरमध्येही चार आरोपी असून, त्यांचे दिल्लीजवळ राहणाऱ्या गंगाधरशी कनेक्शन समोर आले आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार गंगाधरसोबत पैशांची देवाणघेवाण झाली होती. या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे.
लातूर NEET Paper प्रकरणात मोठी अपडेट
नीट परीक्षा देणाऱ्या लातूरच्या 9 विद्यार्थ्यांकडे पाटणाचे प्रवेशपत्र असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या परीक्षार्थींनी पाटण्याला जाऊन परीक्षा दिली आहे का? महाराष्ट्रातील एनईईटीच्या विद्यार्थ्याला बिहारचे प्रवेशपत्र आणि केंद्र का मिळाले याचा पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणातील फरार आरोपी गंगाधर हा पाटण्यात सतत कोणाच्या तरी संपर्कात होता. गंगाधर हा लातूर येथील जिल्हा परिषदेचा शिक्षक आणि आरोपींच्या संपर्कात असल्याचं उघड झालं आहे.
advertisement
गंगाधरने आरोप फेटाळले
दरम्यान, संशयित आरोपीने सर्व आरोप फेटाळले आहेत. "माझा छळ केला जात असून माझा NEET प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. मी हरियाणात राहत असून नोकरी करतो. मी गुडगावमधील एका कंपनीत ऑपरेटर म्हणून काम करतो, असा दावा त्याने केला आहे. मला NEET म्हणजे काय हे माहित नाही. मी दिल्लीतून पळून गेलेलो नाही, मी मुलांना भेटायला आलो आहे. जर NEETचा कोणी विद्यार्थी माझे नाव घेत असेल तर त्याला माझ्याकडे घेऊन या. लातूरचे आरोपी माझे नाव का घेत आहेत ते मला माहित नाही', अशी प्रतिक्रिया त्याने एका वृत्तवाहिनी दिली होती.
advertisement
दरम्यान, NEET-UG परीक्षेतील अनियमिततेशी संबंधित बिहार, राजस्थान आणि गुजरातमधील पाच प्रकरणांची जबाबदारी सीबीआयने घेतली आहे. एकूण पाच प्रकरणे सीबीआयने ताब्यात घेतली आहेत. तपास यंत्रणेने स्थानिक पोलिसांकडून प्रकरणाची फाइल ताब्यात घेतली आहे.
लातूरमध्ये चौघांना अटक
त्याचवेळी लातूर येथून एटीएसने जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाला अटक केली असून चार जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. NEET-UG परीक्षेत यश मिळवण्यासाठी पैसे द्यायला तयार असलेल्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी एक टोळी चालवली जात असल्याचे तपासात उघड झाल्याचे पोलिसांनी सोमवारी सांगितले. नांदेड एटीएस युनिटने ज्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे त्यात लातूरचे दोन शिक्षक, नांदेडमधील एक व्यक्ती आणि दिल्लीतील रहिवासी यांचा समावेश आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/लातूर/
NEET Paper Leak : NEET पेपर घोटाळ्यात मोठी अपडेट! लातूरमधील 9 विद्यार्थी संशयाच्या भोवऱ्यात; काय आहे कारण?
Next Article
advertisement
Dhule Election: भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आर
  • मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची तोडफोड

  • भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

View All
advertisement