Latur News : कार आणि ऊसाच्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात, तीन ZP शिक्षकांसह चौघे ठार
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
ऊसाचा ट्रॅक्टर आणि कारची जोराची धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की कारचं इंजिन बाजूला निघून पडलं होतं.
नितिन बनसोडे, लातूर, 22 डिसेंबर : तुळजापूर औसा महामार्गावर भीषण अपघात झाला असून यात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. चौघांपैकी तिघेजण जिल्हा परिषदेचे शिक्षक असल्याची माहिती समोर आली आहे. कार आणि ऊसाच्या ट्रकचा मध्यरात्री भीषण अपघात झाला. अपघातात कारचा चक्काचूर झाला होता.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, लातूर जिल्ह्यातील तुळजापूर औसा महामार्गावर ऊसाचा ट्रॅक्टर आणि कारची जोराची धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की कारचं इंजिन बाजूला निघून पडलं होतं. कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला. मध्यरात्री झालेल्या या अपघातानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
गाडीतून मृतदेह बाहेर काढून ते औसा इथल्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे बाबा पठान, जीएम बिराजदार, रणदिवे आणि राजू बागवान अशी असल्याचं समजते. ट्रॅक्टर चालकाबाबत माहिती समजू शकली नाही. या अपघाताची नोंद पोलीसात झाली असून अधिक तपास सुरू आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 22, 2023 11:03 AM IST










