Latur News : लातूरमध्ये उच्चभ्रु वस्तीतील कुंटणखाण्यावर धाड; 2 अल्पवयीन मुलं आढळल्याने खळबळ
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Latur News : उदगीर ग्रामीण पोलिसांनी शहरातील कुंठणखान्याचा भांडाफोड करत सहाजणांना अटक करण्यात आली आहे. तर दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.
लातूर, (नितिन बनसोडे, प्रतिनिधी) : राज्यात लोकसभा निवडणुकींची धामधूम सुरू असताना लातूरमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. ग्रामीण पोलीस ठाण्याजवळी सोमनाथपूर हद्दीतील एका उच्चभ्रु वस्तीतील कुंटनखान्यावर शनिवारी सायंकाळी ग्रामीण पोलिसांनी धाड टाकून 8 जणांना ताब्यात घेतले. दलालांच्या हातून दोन पीडितांची सुटका करुन लातूरच्या महिला सुधारगृहात रवानगी केली. तर उर्वरीत 6 जणांवर अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमानुसार ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील मारवाड कॉलनी परिसरात कुंठण खान्यावर उदगीर ग्रामीण पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली. यामध्ये आठ जणांना ताब्यात घेवून सहा आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत, तर दोन पीडित महिलेची महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की मारवाड कॉलनी सोमनाथपूर परिसरात देह व्यापार सुरू असल्याची गुप्त माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ग्रामीण पोलिसांनी धाड टाकली असता दोन आरोपी महिला, दोन पीडित महिला, दोन पुरुष व दोन अल्पवयीन मुलांस पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपी महिला व आरोपीची मुलगी यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांना पैशाचे अमिष दाखवून देह व्यापारास प्रवृत्त करून घेऊन कुंठणखाना चालवण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊन कुंठणखाणा चालवताना मिळून आले.
advertisement
अल्पवयीन मुलांची सुधारगृहात रवानगी
view commentsपोलीस उपनिरीक्षक रवी मुंढे यांच्या फिर्यादीवरुन कुंठणखाना चालवणाऱ्या कल्लुबाई नरसींह माने, मुलगी बालिका नरसींह माने, विठ्ठल मारोती केंद्रे (वय-30) रा.तळ्याची वाडी ता. कंधार, विठ्ठल भगवान नरसींगे (वय-35) रा. निळकंठ, ता. औसा. व दोन अल्पवयीन बालक अशा आठ जणांवर शनिवारी रात्री अकराच्या सुमारास देह व्यापार प्रतिबंध अधिनियमानुसार ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोन पीडित महिलांना रात्री बारा वाजता येथील प्रथम वर्ग न्यायदिंडाधिकार्यांसमोर हजर केले असता त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना लातूरच्या महिला सुधारगृहात रवानगी करण्याचे आदेश देण्यात आले. बाकी सहा आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली आहे.
Location :
Latur,Maharashtra
First Published :
April 14, 2024 5:40 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/लातूर/
Latur News : लातूरमध्ये उच्चभ्रु वस्तीतील कुंटणखाण्यावर धाड; 2 अल्पवयीन मुलं आढळल्याने खळबळ


