Railway Timetable Update: मुंबईची तुंबई, लोकलचा खोळंबा; रेल्वेच्या वेळापत्रकात मोठे बदल, बघा एका क्लिकवर
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Railway Timetable Update: मुंबईतील पावसाचा परिणाम लांब पल्ल्याच्या गाड्यांवर देखील झाला आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत.
मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने रस्ते वाहतूक ठप्प झाली असून रेल्वे सेवाही विस्कळीत झाली आहे. पावसाचा जोर इतका जास्त आहे की, अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. त्यामुळे अनेक लोकल रद्द करण्यात आल्या आहेत तर काही लोकल अतिशय धिम्या गतीने धावत आहेत. मुंबईतील पावसाचा परिणाम लांब पल्ल्याच्या गाड्यांवर देखील झाला आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत.
पावसामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस या दोन ठिकाणांहून 19 ऑगस्ट 2025 रोजी सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासनाने सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध केलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटणाऱ्या गाड्यांचे सुधारित वेळापत्रक
1) 11011 सीएसएमटी - धुळे ही गाडी नियोजित वेळेनुसार दुपारी 12 वाजता सुटते. सुधारित वेळेनुसार आता ही गाडी दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुटणार आहे.
advertisement
2) 12071 सीएसएमटी - हिंगोली जनशताब्दी एक्सप्रेस नियोजित वेळेनुसार दुपारी 12 वाजून 10 मिनिटांनी सुटते. पावसामुळे ही गाडी दुपारी 2 वाजून 15 मिनिटांनी सुटेल.
3)22159 सीएसएमटी - चेन्नई सेंट्रल गाडीची नियोजित वेळ दुपारी 12 वाजून 45 मिनिटांची असते. ही गाडी दुपारी 2 वाजून 45 मिनिटांनी सुटेल.
4) 20706 सीएसएमटी - नांदेड वंदे भारत एक्सप्रेसचा नियोजित वेळ दुपारी 1 वाजून 10 मिनिटांची असते. ही गाडी दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुटेल.
advertisement
5) 12188 सीएसएमटी - जबलपूर गरीबरथ एक्सप्रेस दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुटते. पावसामुळे ही गाडी दुपारी 3 वाजता सोडली जाणार आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटणाऱ्या गाड्यांचे सुधारित वेळापत्रक
1) 22511 एलटीटी - कामख्या कर्मभूमी एक्सप्रेसची नियोजित वेळ दुपारी 1 वाजून 15 मिनिटांची असते. ही गाडी दोन तास उशीराने सुटणार असून 3 वाजून 15 मिनिटांनी गाडी सुटेल.
advertisement
2) 11071 एलटीटी - बलिया कमायनी एक्सप्रेस ही गाडी दुपारी 1 वाजून 50 मिनिटांनी सुटते. मात्र, पावसामुळे गाडीची वेळ दुपारी 3 वाजून 30 मिनिटे करण्यात आली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 19, 2025 1:52 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Railway Timetable Update: मुंबईची तुंबई, लोकलचा खोळंबा; रेल्वेच्या वेळापत्रकात मोठे बदल, बघा एका क्लिकवर


