Maharashtra Elecction 2024: ठाकरेंच्या वरळीत राडा ते शरद पवारांच्या नेत्याला मारहाण, दिवसभरात काय घडलं?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
Maharashtra Assembly Elecction 2024: खरं तर महाराष्ट्रात दोन पक्षात बंडखोरी होऊन फाटाफुट झाली आहे. ज्यामुळे दोन पक्षांचे चार गट पडले आहेत. अशा परिस्थितीत या गटांमध्ये जिंकण्यासाठीचा संघर्ष टोकाला पोहोचला आहे. यातूनच या घडामोडी घडताना दिसत आहे. त्यामुळे आज मतदानाच्या दिवशी, दिवसभरात काय घडलं आहे. हे जाणून घेऊयात.
Maharashtra Assembly Elecction 2024: राज्यात आज विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान पार पडते आहे. या मतदानाच्या दिवशी राज्यातील अनेक मतदार संघात धक्कादायक घटना घडल्या आहे. काही ठिकाणी दोन पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये राडा झाला आहे. तर काही ठिकाणी बाचाबाची,धक्काबुक्की आणि मारहाणीच्या घटना घडल्या आहे. काही ठिकाणी पैसे वाटल्याच्याही घटना घडली आहे. त्यामुळे मतदानापेक्षा या राड्यांनी आजचा दिवस गाजला आहे. विशेष म्हणजे 1962 सालानंतर पहिल्यांदा कोणत्या अशा मतदानाच्या दिवशी राडा झाल्याच्या इतक्या घटना घडल्या आहेत.त्यामुळे आज दिवसभरात नेमकं कुठे काय घडलंय? हे जाणून घेऊयात.
खरं तर महाराष्ट्रात दोन पक्षात बंडखोरी होऊन फाटाफुट झाली आहे. ज्यामुळे दोन पक्षांचे चार गट पडले आहेत. अशा परिस्थितीत या गटांमध्ये जिंकण्यासाठीचा संघर्ष टोकाला पोहोचला आहे. यातूनच या घडामोडी घडताना दिसत आहे. त्यामुळे आज मतदानाच्या दिवशी, दिवसभरात काय घडलं आहे. हे जाणून घेऊयात.
शरद पवारांच्या नेत्याला मारहाण
बीडच्या परळी मतदारसंघात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या मतदार संघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याला बेदम चोपल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर आता धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केल्याचा आरोप होत आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. सविस्तर वृत्त
advertisement
शरद पवार गटाच्या नेत्याला बेदम मारहाण pic.twitter.com/7T8OQKzFK8
— News18Lokmat (@News18lokmat) November 20, 2024
धुळ्यात पैसे वाटपातून तरूणाला चोपलं
धुळ्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मतदान केंद्रावर थेट पैसे वाटप होत असल्याच्या संशयातून एका तरुणाला मारहाण करण्यात आली आहे. धुळे शहरातील संभाजीनगर भागातील मतदान केंद्रावर ही घटना घडली. मतदान केंद्राबाहेर तरुणाला चोप दिल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. मारहाण होत असल्याचे पाहून पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. सविस्तर वृत्त...
नांदगावमध्ये भुजबळांना जीवे मारण्याची धमकी
advertisement
नाशिकच्या नांदगाव मध्ये जोरदार राडा झाला. समीर भुजबळ आणि शिंदे गटाचे विद्यमान आमदार सुहास कांदे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. मतदानासाठी आणण्यात आलेल्या मतदारांच्या मुद्यावरून दोन्ही गटात राडा झाला. या घटनेमुळे मतदारसंघात तणावाचे वातावरण आहे. शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार आणि उमेदवार सुहास कांदे आणि अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सुहास कांदे यांनी दिलेली धमकी कॅमेऱ्यात कैद झाली. सविस्तर वृत्त
advertisement
विरारमध्ये बविआच्या कार्यकर्त्यांनी वाहने अडवली
हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे केंद्रीय नेते विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप करत घेरले होते. या घटनेमुळे विरारमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर मतदानाच्या एक आधी, मंगळवारी रात्री उशिरा विरारमध्ये बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काही वाहने थांबवली. ही सगळी वाहने गुजरात पासिंगची होती. सविस्तर वृत्त
advertisement
वरळीत शिंदेंच्या कार्यकर्त्याला मनसैनिकांची मारहाण
शिवसेनेच्या उमेदवाराला मनसेचा पाठिंबा असे फेकपत्र वरळीमधील शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी वरळी मध्ये वाटप केल्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली आहे. त्याचसोबत या घटनेचा त्याला जाब देखील विचारला आहे. या घटनेने वरळी विधानसभा मतदार संघात तणाव निर्माण झाला आहे. या प्रकरणी वरळी विधानसभेचे उमेदवार संदिप देशपांडे पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. सविस्तर वृत्त
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 20, 2024 3:42 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elecction 2024: ठाकरेंच्या वरळीत राडा ते शरद पवारांच्या नेत्याला मारहाण, दिवसभरात काय घडलं?


