Ajit Pawar On Yugendra Pawar : काका-पुतण्या वादाचा नवा अंक, अजित पवारांचा युगेंद्रवर पहिला वार...
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Maharashtra Elections Ajit Pawar On Yugendra Pawar : बारामती विधानसभा निवडणुकीत अजित पवारांविरोधात त्यांचे पुतणे युगेंद्र पवार मैदानात उतरले आहेत. आता अजित पवारांनी आता युगेंद्रवर पहिला बोचरा केला आहे.
जितेंद्र जाधव, प्रतिनिधी, पुणे : राज्याच्या राजकारणात काका-पुतण्या वादाचा आणखी एक अंक सुरू झाला आहे. बारामती विधानसभा निवडणुकीत अजित पवारांविरोधात त्यांचे पुतणे युगेंद्र पवार मैदानात उतरले आहेत. आता अजित पवारांनी आता युगेंद्रवर पहिला बोचरा केला आहे. लोणी भापकर येथे ग्रामस्थांशी संवाद साधताना अजित पवारांनी आपले काका, शरद पवार यांच्यावरही टीका केली. त्यानंतर युगेंद्र यांनाही लक्ष्य केले.
बारामती विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार कोणतीही जोखीम स्वीकारण्यास तयार नाहीत. राष्ट्रवादीत फूट पाडल्यानंतर अजित पवारांनी महायुतीत प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना धक्का बसला. बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा सुप्रिया सुळे यांनी पराभव केला. या निवडणुकीत बारामती विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना जवळपास 48 हजार मतांची आघाडी होती. त्यानंतर आता अजित पवार यांनी विधानसभेच्या निवडणुकीसाठी त्यांनी जोखीम न घेता गाव दौरे सुरू केले आहेत.
advertisement
शरद पवारांनी टीकास्त्र....
शरद पवारांच्या वयाचा आदर करून सुप्रियाला निवडून दिले. शरद पवार साहेब म्हणाले मी निवृत्त होणार आहे. वयाने निर्णय घेणार असतील. पण, त्यांच्या पुढचे काम करू शकतं? मी भावनिक करीत नाही. पण शरद पवार 30 वर्ष राज्यात काम केल्यानंतर त्यांनी दिल्लीत काम केलं असल्याचे अजित पवारांनी म्हटले. मी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काम करीत नाही. माझी फुशारकी नाही तर काम बोलतं असेही अजित पवारांनी म्हटले.
advertisement
लोकसभेला पण सांगायचे साहेबांची शेवटची निवडणूक आहे सुप्रिया कडून लक्ष द्या. आता पण सांगतात साहेबांची शेवटची निवडणूक आहे नातवाकडे लक्ष द्या. आता हे अवघडच आहे. मी पण पुतण्या आहे ना? मुलगी झाली की थेट नातूच समोर आणला, मी पण मुलासारखाच आहे ना? असा सवाल अजित पवारांनी केला.
युगेंद्रवर अजितदादांचा वार
advertisement
यावेळी अजित पवारांनी आपला पुतण्या आणि शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्यावर टीका केली. त्यांनी म्हटले की, 1989 मध्ये शरद पवार म्हणत होते की, मी अजितला तिकीट देणार नाही. पण मला 1991 ला मला तिकीट दिले. आता काही लोक काळ काम सुरू केलं नाही की त्यांना आमदारकीची स्वप्न पडायला लागली, असा टोलाही युगेंद्रला लगावला.
advertisement
अजित पवारांनी पुढे म्हटले की, मला इंग्लिश येऊ नाहीतर येऊ नये. परंतु मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे. मी साडे साडेसहा लाख कोटींचा बजेट सादर करतो. साडेसहा लाख कोटी मधला त्याला टिंब काढून दाखव म्हणावं. तो माझा पुतण्या आहे. मी त्याच्यावर टीका नको करायला, असे टीकास्त्र अजित पवारांनी युगेंद्र पवारांवर सोडले.
view commentsLocation :
Baramati,Pune,Maharashtra
First Published :
November 13, 2024 12:06 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajit Pawar On Yugendra Pawar : काका-पुतण्या वादाचा नवा अंक, अजित पवारांचा युगेंद्रवर पहिला वार...


