Sharad Pawar: राष्ट्रवादीला किती जागा मिळणार? शरद पवारांनी थेट आकडाच सांगितला
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Sharad Pawar Prediction Maharashtra Elections 2024 : शरद पवार यांनी आपलं लक्ष आता विधानसभा निवडणुकीकडे वळवले आहे. राज्यात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत किती जागांवर पक्षाला यश मिळेल, याबाबत त्यांनी भाष्य केले.
मुंबई : राज्यातील यंदाची विधानसभा निवडणूक चांगलीच चुरशीची होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीने राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणावर बदलली. पक्षातील फुटीनंतर शरद पवारांनी नव्याने पक्ष बांधणीस सुरुवात केली. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलेच यश मिळाले. आता शरद पवार यांनी आपलं लक्ष आता विधानसभा निवडणुकीकडे वळवले आहे. राज्यात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत किती जागांवर पक्षाला यश मिळेल, याबाबत त्यांनी भाष्य केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी 'बोल भिडू'ला दिलेल्या मुलाखतीत राजकीय मुद्यांवर भाष्य केले. शरद पवार यांनी मुलाखतीत सांगितले की, राज्यात सध्या महाविकास आघाडीसाठी चांगलं वातावरण आहे. लोकांचा कल परिवर्तनाकडे दिसत असून आम्हाला चांगलं यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यात जवळपास 40 जागांवर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत होणार आहे.
advertisement
किती जागांवर यश मिळणार? पवारांनी आकडा सांगितला...
पक्षातील फुटीनंतर आपल्याला या निवडणुकीत यश मिळेल असा विश्वास व्यक्त करताना शरद पवारांनी याआधी पडलेल्या फुटीनंतरच्या निवडणूक निकालांचा उल्लेख केला. याआधीदेखील मला आमदार सोडून गेले होते. मात्र, त्यातील फार कमीजण पुन्हा निवडणुकीत विजयी झाले. लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला असल्याचे त्यांनी म्हटले. आपल्याला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत 50-60 जागांवर विजय मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्या प्रचाराच्या निमित्ताने आपण राज्यात फिरत असून लोकांचा कल लक्षात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
advertisement
अजित पवारांना नो एन्ट्री
या मुलाखतीत निवडणुकीनंतर जर अजित पवार तुमच्याकडे आले तर त्यांना सोबत घेणार का? असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी म्हटले की, “आमचा संघर्ष हा विचारधारेचा आहे, हे सर्वांनी समजून घेतले पाहिजे. आम्हाला त्यांची (भारतीय जनता पक्ष) विचारधारा मंजूर नाही. त्यांच्या सोबत काम करणे ही त्यांची (अजित पवार) भूमिका असेल तर कुणालाच प्रवेश देणार नाही”, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
advertisement
इतर संबंधित बातमी : Ajit Pawar On Yugendra Pawar : काका-पुतण्या वादाचा नवा अंक, अजित पवारांचा युगेंद्रवर पहिला वार...
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 14, 2024 8:13 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sharad Pawar: राष्ट्रवादीला किती जागा मिळणार? शरद पवारांनी थेट आकडाच सांगितला


