Sharad Pawar: शरद पवारांना पुन्हा 'ट्रम्पेट'चा फटका? 163 मतदारसंघात अपक्ष रिंगणात, राष्ट्रवादीविरोधात किती उमेदवार?
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Sharad Pawar Maharashtra Elections 2024: राज्यातील 288 मतदारसंघापैकी तब्बल 163 मतदारसंघात ट्रम्पेट निवडणूक चिन्हासह अपक्ष रिंगणात आहेत. त्यातील बहुतांशी उमेदवार हे राष्ट्रवादी विरोधात आहेत.
मुंबई : शरद पवारांना लोकसभा निवडणुकीत तुतारीची साधर्म्य असणाऱ्या निवडणूक चिन्हामुळे मोठा फटका बसला होता. त्यानंतर आता, ट्रम्पेट हे निवडणूक चिन्ह विधानसभा निवडणुकीत काय कमाल करणार याकडे लक्ष लागले आहे. राज्यातील 288 मतदारसंघापैकी तब्बल 163 मतदारसंघात ट्रम्पेट निवडणूक चिन्हासह अपक्ष रिंगणात आहेत. त्यातील बहुतांशी उमेदवार हे राष्ट्रवादी विरोधात आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीच्या गोटात रणनीतीवर खल सुरू आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार यांच्या नेतृत्वातील गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे निवडणूक चिन्ह मिळाले. मात्र, लोकसभेत अपक्षांना तुतारी असा उल्लेख असलेले ट्र्म्पेट निवडणूक चिन्ह मिळाल्याने मोठा फटका बसला होता. काही जागांवर अपक्षांनी शरद पवारांची राजकीय गणिते बिघडवली. आता विधानसभेतही याचा फटका बसू नये यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.
advertisement
'बटेंगे तो कटेंगे' घोषणेची शरद पवारांकडून चिरफाड, भाजपवर प्रश्नांची सरबत्ती, मोदी-फडणवीसांना सुनावलं
163 मतदारसंघात ट्रम्पेट वाजणार, राष्ट्रवादीविरोधात किती?
'टाईम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, राज्यातील 163 मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवारांना ट्र्म्पेट हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. त्यापैकी 78 मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार आहेत. शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचे निवडणूक चिन्ह हे तुतारी वाजवणारा माणूस हे आहे. तर, अपक्षांना ट्रम्पेट निवडणूक चिन्ह मिळाले. त्यातील 50 जागांवर राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार आहेत. तर, उर्वरित 85 मतदारसंघात काँग्रेस अथवा शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आहेत.
advertisement
रोहित विरुद्ध रोहित... नावाचाही खेळ
काही मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या नावाशी साधर्म्य असलेले उमेदवार आहेत. त्यातील काही ठिकाणी या अपक्षांना ट्रम्पेट हे निवडणूक चिन्ह मिळाले. सांगलीतील तासगाव-कवठे महांकाळमध्ये शरद पवार गटाचे रोहित सुमनताई आर आर पाटील यांच्या विरोधात 3 रोहित पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्याशिवाय कर्जत जामखेडचे आमदार रोहित पाटील यांच्याविरोधात रोहित चंद्रकांत पवार हे अपक्ष उमेदवार ट्रम्पेट हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
advertisement
लोकसभेत पवारांना फटका
लोकसभा निवडणुकीत शरद पवारांना निवडणूक चिन्हाशी साधर्म्य असलेल्या अपक्षांचा फटका बसला होता. ट्रम्पेट या निवडणूक चिन्हाचे मराठी भाषांतर पिपाणी असे केले होते. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार भास्कर भगरेंविरोधात अपक्ष उमेदवार भास्कर भगरे यांना 1 लाख 03 हजार 632 इतकी मते मिळाली. तर, दुसरीकडे सातारा लोकसभा मतदारसंघात पवारांचे उमेदवार शशिकांत शिंदे 34 हजार मतांनी पराभूत झाले. त्यांच्याविरोधात असलेल्या अपक्ष उमेदवाराला पिपाणी या निवडणूक चिन्हाला 38 हजार मते मिळाली. त्यामुळे आता विधानसभेत फटका बसू नये यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी अधिकच सतर्क आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 15, 2024 8:34 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sharad Pawar: शरद पवारांना पुन्हा 'ट्रम्पेट'चा फटका? 163 मतदारसंघात अपक्ष रिंगणात, राष्ट्रवादीविरोधात किती उमेदवार?


