Maharashtra Elections Raj Thackeray : राज ठाकरेंनी व्यक्त केली खंत, ''उद्धव ठाकरेंना भावापेक्षा 'ते' जवळचे...''

Last Updated:

Maharashtra Elections Raj Thackeray : एका मुलाखतीत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबत युती का होत नाही, याचे कारण देताना उद्धव यांना भाऊ जवळचा वाटत नसल्याचे म्हटले.


राज ठाकरेंनी व्यक्त केली खंत, ''उद्धव ठाकरेंना स्वत:च्या भावापेक्षा 'ते' जवळचे...''
राज ठाकरेंनी व्यक्त केली खंत, ''उद्धव ठाकरेंना स्वत:च्या भावापेक्षा 'ते' जवळचे...''
मुंबई : राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढू लागला आहे. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे राज यांनी आपल्या मनातील खंत व्यक्त केली आहे. एका मुलाखतीत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबत युती का होत नाही, याचे कारण देताना उद्धव यांना भाऊ जवळचा वाटत नसल्याचे म्हटले.
'दैनिक लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या युतीबाबत भाष्य केले. राज ठाकरे यांनी मुलाखतीत पुढे म्हटले की, आम्ही एकत्र येणे असे वाटणे वेगळं आहे आणि असे व्हायचे असते तर ते कधीच झाले असते. त्यांच्याकडूनही काही लोक बोलत असतात, सांगत असतात आणि करत असतात असेही राज यांनी सांगितले. ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाराष्ट्राचे चित्र बदलेल असे वाटत नाही का, या प्रश्नावर बोलताना राज यांनी मी काय करणार आणि बोलणार तरी काय, असे म्हटले.
advertisement

उद्धव यांना भावापेक्षा 'ती' लोक जवळची...

उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबतवर बोलताना राज ठाकरे यांनी सांगितले की, माझ्या इच्छेचा किंवा माझ्या एकट्याचा विषयच नाही. प्रश्न असा आहे की यात चर्चा होणे गरजेचे आहे. चर्चा जर होतच नसेल तर त्या बोलण्याला काय अर्थ आहे, असे म्हटले. उद्धव ठाकरे यांना भावापेक्षा काँग्रेस आणि राष्ट्रवादी जवळचे वाटतात, असेही राज यांनी म्हटले.
advertisement

याला खंत म्हणा अथवा...

उद्धव यांच्यासोबत एकत्र येण्याबाबत पुढं बोलताना राज ठाकरे यांनी म्हटले की, हिंदुत्ववादी शिवसेनेचा वर्सोव्याचा उमेदवार हारून खान असेल. त्यांचे दिंडोशीचे उमेदवार उर्दूतून पत्रके काढत असतील. काँग्रेस राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरून कुठेही बाळासाहेब ठाकरेंचे नावही घेतले जात नसेल, काँग्रेसची मफलर गळ्यात घालून उद्धव ठाकरे फिरणार असतील तर सगळ्याच गोष्टींचा व्यभिचार करण्यासाठी यांच्याकडे वेळ आहे आणि बाकीच्या गोष्टींसाठी नाही. याला तुम्ही माझी खंत म्हणा किंवा अन्य काही, पण हे वास्तव असल्याचेही राज यांनी मुलाखतीत म्हटले.
advertisement

इतर संबंधित बातमी :

view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections Raj Thackeray : राज ठाकरेंनी व्यक्त केली खंत, ''उद्धव ठाकरेंना भावापेक्षा 'ते' जवळचे...''
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement