Mahayuti : महायुतीचा महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला! म्हाडा, सिडकोचे कारभारी कोण? समोर आली मोठी अपडेट
- Published by:Shrikant Bhosale
- Reported by:UDAY JADHAV
Last Updated:
Maharashtra Politics : महायुतीच्या समन्वय समितीच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत महामंडळ वाटपाचं सूत्र निश्चित करण्यात आलं आहे.
मुंबई: राज्यातील विविध महामंडळांवर नियुक्त्या करण्याबाबत महायुतीतील पेच अखेर सुटला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, महायुतीच्या समन्वय समितीच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत महामंडळ वाटपाचं सूत्र निश्चित करण्यात आलं असून, संख्याबळाच्या आधारे भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यात वाटप करण्यावर एकमत झालं आहे.
कोणाच्या वाट्यात किती महामंडळे?
मागील काही महिन्यांपासून महामंडळाच्या वाटपावरून महायुतीमध्ये चर्चा सुरू होती. महायुतीच्या समन्वय समितीची बैठकदेखील पार पडली. समोर आलेल्या माहितीनुसार, भाजपच्या वाट्याला सर्वाधिक 44 महामंडळे, शिंदे यांच्या शिवसेनेला 33, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 23 महामंडळं मिळणार आहेत. महत्त्वाचं बाब म्हणजे आता या वाटपातून महायुतीतील 'मोठा भाऊ' कोण हेही स्पष्ट झाल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.
advertisement
महत्त्वाच्या महामंडळांवर रस्सीखेच सुरू
महामंडळ वाटपाचा आकडा निश्चित झाला असला तरी अद्यापही महत्त्वाच्या महामंडळाबाबत चर्चा अद्याप सुरू असल्याची माहिती आहे. मुंबई म्हाडा (MHADA), सिडको (CIDCO), एमएमआरडीए, एमटीडीसी (MTDC) अशा प्रभावी महामंडळांच्या अध्यक्षपदावर दावे करण्यात तिन्ही पक्षांकडून करण्यात आले होते. विशेषतः सिडको आणि म्हाडा या दोन्ही महामंडळांवर शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
advertisement
नाराज आमदारांची समजूत घालण्यासाठी वाटप?
महामंडळांवरील नेमणुका करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नाराज आमदारांची नाराजी कमी करण्याचा प्रयत्न महायुतीकडून केला जात असल्याचे बोलले जात आहे. मंत्रिमंडळात स्थान न मिळालेल्या आमदारांसह जुन्या कार्यकर्त्यांकडून महामंडळांवरील नियुक्त्यांची मागणी सुरू आहे.
advertisement
advertisement
महामंडळ वाटप हा केवळ अधिकारांचं विभाजन नसून, तो आगामी निवडणुकांसाठी पक्षांतील "ताकद" मोजण्याचा एक प्रकार असल्याने युतीतील अंतर्गत राजकारण अधिकच धारदार होणार असल्याचं बोललं जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 23, 2025 12:11 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mahayuti : महायुतीचा महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला! म्हाडा, सिडकोचे कारभारी कोण? समोर आली मोठी अपडेट