विषयचं Hard! मनोज जरांगेंसाठी कोल्हापुरच्या महिलेचा धाडसी निर्णय,अख्खा मराठा समाज करतोय कौतुक
- Published by:Prachi Amale
- Reported by:Dnyaneshwar Pandurang Salokhe
Last Updated:
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलना दरम्यान सखुबाई खोत यांनी घेतलेला निर्णय सध्या मराठा समाजात चर्चेचा विषय ठरत आहे.
कोल्हापूर : मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून आंदोलनाला व्यापक जनाधार मिळत आहे. पन्हाळा तालुक्यातील वेखंडवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सखुबाई खोत यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत आंदोलनाला थेट पाठिंबा दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनात सखुबाई खोत यांनी घेतलेला निर्णय सध्या मराठा समाजात चर्चेचा विषय ठरत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरला आहे. सरकारकडून अद्याप ठोस निर्णय न झाल्यामुळे अनेक ठिकाणी आंदोलने सुरूच आहेत. या पार्श्वभूमीवर सामान्य कार्यकर्त्यांपासून विविध पदाधिकारी, जनप्रतिनिधी आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवत आहेत. या आंदोलनात ग्रामपातळीवरील महिला नेत्यांनीही पुढाकार घेतला आहे. त्यात आता सखुबाई खोत यांचा समावेश झाला आहे.
धाडसी निर्णयाचे गावकऱ्यांसह मराठा समाजाकडून स्वागत
advertisement
सखुबाई खोत या वेखंडवाडी येथील उपसरपंच पदावर कार्यरत होत्या. मात्र, समाजाच्या न्याय्य मागणीसाठी आपला राजीनामा देत करून त्यांनी जाहीर आरक्षण लढ्याला पाठिंबा दिला आहे. त्यांचा राजीनामा सरपंच संतोष खोत यांनी स्वीकारला आहे. त्यांच्या या धाडसी निर्णयाचे गावकऱ्यांसह मराठा समाजाने स्वागत केले असून त्यांचे कौतुक होत आहे.
राज्य सरकारवरील दबाव वाढण्याची शक्यता
advertisement
मराठा समाजासाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला सातत्याने विविध स्तरांतून पाठींबा मिळत आहे. यात ग्रामपंचायत पातळीवरील राजकीय पदाधिकारीही आता राजीनाम्याच्या मार्गाने आंदोलनात उतरू लागल्याने राज्य सरकारवरील दबाव वाढण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातील महिला नेत्या असूनही सखुबाई खोत यांनी समाजाच्या हितासाठी पदाचा त्याग केला, अशा प्रतिक्रिया मराठा बांधवांकडून येत आहे.
advertisement
गावाकऱ्यांनी दिला जाहीर पाठींबा, सगळेचं करतायतं कौतुक
गावातील अनेक नागरिकांनी त्यांच्या या निर्णयाला पाठिंबा दर्शवला असून, "आरक्षण मिळवण्यासाठी गरज भासली तर आम्हीही आंदोलनासाठी सज्ज आहोत," अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. मराठा समाजात ऐक्य वाढवण्यासाठी आणि आंदोलनाला बळकटी मिळवून देण्यासाठी सखुबाई खोत यांचा राजीनामा मोलाचा ठरत असल्याची भावना व्यक्त केल्या आहे. त्यामुळे आगामी काळात आणखी ग्रामपातळीवरील पदाधिकारी अशाच प्रकारे आंदोलनाला पाठींबा देतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
advertisement
हे ही वाचा :
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
September 01, 2025 6:31 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
विषयचं Hard! मनोज जरांगेंसाठी कोल्हापुरच्या महिलेचा धाडसी निर्णय,अख्खा मराठा समाज करतोय कौतुक


