जरांगे भाषा जपून वापरा, आमच्यावर हात टाकायच्या वार्ता करत असाल तर..., निलेश राणेंचा थेट इशारा
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
मनोज जरांगे पाटील आणि भाजपा आमदार तथा मंत्री नितेश राणे यांच्यात वादाला तोंड फुटलं आहे. आता या वादात नितेश राणेंचे मोठे बंधू निलेश राणे यांनीही उडी घेतली असून, त्यांनी जरांगेंना थेट इशारा दिला आहे.
मुंबई: मागील पाच दिवसांपासून मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत उपोषण करायला बसले आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर त्यांचं उपोषण सुरू आहे. काहीही झालं तरी ओबीसीतून आरक्षण घेणार, असा पवित्रा जरांगे यांनी घेतला आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील आणि भाजपा आमदार तथा मंत्री नितेश राणे यांच्यात वादाला तोंड फुटलं आहे. नितेश राणेंनी जरांगेंवर टीके केल्यानंतर जरांगेंनी राणेंना "चिचुंद्री" म्हटले होते. आता या वादात नितेश राणेंचे मोठे बंधू निलेश राणे यांनीही उडी घेतली असून, त्यांनी जरांगेंना थेट इशारा दिला आहे.
निलेश राणे काय म्हणाले?
निलेश राणे यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट करत म्हटले आहे की, "नितेश राणे एखाद्या विषयावर बोलल्यावर तुम्ही टीका करा पण वैयक्तिक बोलू नका. नितेश राणे हे काही टोकाचं किंवा वैयक्तिक बोलले नाहीत" असे म्हणत निलेश राणेंनी आपल्या भावाला पाठिंबा दिला. पुढे ते म्हणाले की, "कुठल्याही धमकीला राणे परिवार कधीच घाबरत नाही. तुम्ही जसे मरायला तयार असता तसेच आम्ही राणेही मरायला तयार असतो."
advertisement
"आमच्या परिवाराच्या सदस्यावर कोणी हात टाकण्याच्या वार्ता करत असेल तर ते आम्ही कधीही सहन करणार नाही. त्यामुळे भाषा जपून वापरली पाहिजे. तुम्ही आमच्यासाठी परके नाहीत. त्यामुळे एखादा विषय सोडवताना नातं तुटता कामा नाही, याची काळजी घेतली पाहिजे", असंही निलेश राणे म्हणाले. मनोज जरांगे पाटील तुमचे आणि माझे संबंध नेहमी आपुलकीचे राहिले, कौटुंबिक राहिले आहेत. ते तसेच राहिले पाहिजे. मी आज पर्यंत नातं जपलं, पुढे ही जपेन… आपल्या कडून पण तीच अपेक्षा आहे, असा विनंती वजा इशारा राणेंनी जरांगेंना दिला आहे.
advertisement
नितेश राणे एखाद्या विषयावर बोल्यानंतर त्यावर तुम्ही टीका करा पण वयक्तिक टीका नको.
नितेश काही टोकाचं बोलला नाही, किव्हा वैयक्तिक बोलला नाही.
कुठल्याही धमकीला राणे परिवार कधीच घाबरत नाही, तुम्ही जसे मरायला तयार असता तसेच आम्ही राणे पण असतो.
आमच्या परिवाराच्या सदस्यावर कोण हाथ…
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) September 1, 2025
advertisement
नितेश राणे अन् मनोज जरांगेंमध्ये नक्की वाद काय आहे?
नितेश राणे हे मनोज जरांगे यांच्यावर सातत्याने टीका करताना दिसत आहेत. जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्यानंतर त्याला नितेश राणे यांनी आक्षेप घेतला होता. तेच खासदार सुप्रिया सुळे यांनी जरांगे यांची आझाद मैदानावर भेट घेतल्यानंतर मी हिंदुत्वाचं काम करतो. जिहाद मानसिकतेचे लोक जरांगे यांच्या व्यासपीठावर कसे बसतात? असा सवाल नितेश राणे यांनी केला होता. त्यामुळेच जरांगेदेखील नितेश राणे यांच्यावर सडकून टीका करताना दिसत आहेत. त्यामुळे आता जरांगे-राणे वादाचे नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 02, 2025 7:59 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
जरांगे भाषा जपून वापरा, आमच्यावर हात टाकायच्या वार्ता करत असाल तर..., निलेश राणेंचा थेट इशारा