Laxman Hake Car Attack: ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली, जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न

Last Updated:

Laxman Hake: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे.

लक्ष्मण हाके (ओबीसी नेते)
लक्ष्मण हाके (ओबीसी नेते)
नांदेड : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये याकरिता ठाम वैचारिक भूमिका घेऊन मनोज जरांगे यांच्याविरोधात उभे राहिलेले ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर जीवघेण्या हल्ल्याचा प्रकार घडलेला आहे. काही अज्ञात लोकांनी त्यांची गाडी फोडण्याचा प्रयत्न केला. नांदेड जिल्ह्यातील कंधार येथील बाचोटी गावात हा धक्कादायक प्रकार घडला.
लातुरमध्ये होतो तेव्हा पोलीस आमच्यामागे होते परंतु नांदेडमध्ये आल्यानंतर मात्र पोलीस गायब झाले. १०० ते २०० हल्लेखोरांनी आमच्यावर हल्ला केला. हल्लेखोर मनोज जरांगे यांच्या नावाच्या घोषणा देत होते. एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजीही करत होते, असे लक्ष्मण हाके यांनी सांगितले.
लक्ष्मण हाके यांनी हल्ल्यानंतर काय सांगितले?
उद्या आम्ही कंधार स्टेशनवर मोर्चा काढणार आहोत. माझ्या गाडीवर १०० ते २०० लोकांनी हल्ला केलाय. तोंड बांधून त्यांनी आमच्या कारला लक्ष्य केले. जोपर्यंत आम्ही लातूरमध्ये होतो, तेव्हा पोलीस आमच्यासोबत होते. मात्र, नांदेडमध्ये आलो तेव्हा कोणीही नव्हतं. आमच्या गाडीच्या बोनेटवर चढून हल्ला केला. तोंड बांधून आमच्यावर हल्ला झाला. आरोपीला अटक करत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार आहे, असे लक्ष्मण हाके यांनी सांगितले.
advertisement
मनोज जरांगे पाटील यांना लक्ष्मण हाके यांच्याकडून वर्षभर तगडी टक्कर
लक्ष्मण हाके गेली वर्षभर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये याकरिता ठाम भूमिका मांडत आहेत. यासाठी त्यांनी राज्यातील गावोगावी जाऊन ओबीसी समाजबांधवांचे मेळावे घेऊन आरक्षणविरोधी जनजागृती केली. मनोज जरांगे यांचे आंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू असताना सरकारने जरांगे यांची मागणी मान्य करू नये याकरीता हाके यांनीही वडीगोद्री गावात आमरण उपोषण करून सत्ताधाऱ्यांवर दबाव आणला. जसे जरांगे यांना मराठा समाजाचा मोठा पाठिंबा मिळाला तसा हाके यांनाही ओबीसी समाजाचा मोठा पाठिंबा मिळाला. अगदी ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ, पंकजा मुंडे यांनाही हाके यांच्या आंदोलनाची आणि ओबीसी आरक्षण बचावासाठी उभारलेल्या लढ्याची दखल घ्यावी लागली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Laxman Hake Car Attack: ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली, जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement