MHADA Lottery 2025 : घाई करा! 5,285 घरांच्या लॉटरीसाठी 3 दिवस शिल्लक, शेवटची तारीख काय?
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
MHADA Lottery 2025 : आतापर्यंत जवळपास सव्वा लाख अर्ज आले असून अनामत रक्कम भरणाऱ्यांची संख्याही एक लाखाच्या जवळ जाणारी आहे.
मुंबई : मुंबई आणि आसपासच्या उपनगरांमध्ये जागेच्या आणि घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अशा परिस्थितीत अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांना स्वत:च्या हक्काचं घर घेता येत नाही. अशा नागरिकांसाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) मदतीला धावून येत असतं. म्हाडाच्या कोकण मंडळाच्यावतीने ठाणे, पालघर, कल्याण, रायगड, मालवण यांसारख्या ठिकाणी कमी किमतीत घरं उपलब्ध करून दिली जातात. येत्या काही दिवसात हजारो घरांची सोडत (लॉटरी) काढली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्यासाठी शेवटचे 3 दिवस शिल्लक राहिले आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे शहर व जिल्हा तसेच वसई येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत 5 हजार 285 फ्लॅट व ओरोस, कुळगाव-बदलापूर येथील 77 भूखंड विक्रीकरता सोडत काढली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्यासाठी 28 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
advertisement
आतापर्यंत जवळपास सव्वा लाख अर्ज आले असून अनामत रक्कम भरणाऱ्यांची संख्याही एक लाखाच्या जवळ जाणारी आहे. यापूर्वी झालेल्या सोडतींच्या तुलनेत यावर्षी चांगला प्रतिसाद मिळाला असून अर्जदारांचा कल हा 20 टक्के योजनेतील घरांकडे आहे. 18 सप्टेंबरला लॉटरी काढली जाणार आहे.
म्हाडा कोकण लॉटरी 2025 साठी नोंदणी करण्यासाठी https://housing.mhada.gov.in/ या अधिकृत वेबसाईटचा वापर करता येईल. 28 ऑगस्टपर्यंत आलेल्या अर्जांची 18 सप्टेंबरला लॉटरी काढली जाणार आहे. ज्यांना लॉटरीमध्ये घर मिळत नाहीत, अशांची अनामत रक्कम परत केली जाईल.
advertisement
परतावा कधी आणि कसा मिळतो?
view commentsम्हाडाच्या लॉटरीचा निकाल जाहीर केल्यानंतर काही दिवसांतच घर न मिळालेल्या अर्जदारांना परतावा देण्याची प्रक्रिया सुरू होते. परताव्याची प्रक्रिया त्याच पेमेंट पद्धतीद्वारे केली जाते जी नोंदणी रक्कम भरण्यासाठी वापरली जाते. नमूद केलेल्या तारखेमध्ये परतावा न मिळाल्यास, अर्जदार हेल्पलाइनशी संपर्क साधू शकतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 26, 2025 12:45 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
MHADA Lottery 2025 : घाई करा! 5,285 घरांच्या लॉटरीसाठी 3 दिवस शिल्लक, शेवटची तारीख काय?


