advertisement

Jaya Ekadashi 2026: रवि योगात आज जया एकादशी; भूत, पिशाच योनितून मुक्तिचा दिवस, पूजा ​विधी, मुहूर्त-मंत्र

Last Updated:

Jaya Ekadashi 2026 Puja Vidhi: जया एकादशीवर रवी योग 20 मिनिटांसाठी आहे. जे लोक आज व्रत करत आहेत, ते जया एकादशीनिमित्त विष्णू पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 07:11 ते सकाळी 08:32 दरम्यान पाळू शकतात. या काळात रवी योग देखील उपलब्ध असेल. जे लोक विधीपूर्वक..

News18
News18
मुंबई : आज गुरुवारी जया एकादशी आहे. एकादशी तिथीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. माघ शुद्ध एकादशीला जया एकादशीचे व्रत केले जाते. जया एकादशीवर रवी योग 20 मिनिटांसाठी आहे. जे लोक आज व्रत करत आहेत, ते जया एकादशीनिमित्त विष्णू पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 07:11 ते सकाळी 08:32 दरम्यान पाळू शकतात. या काळात रवी योग देखील उपलब्ध असेल. जे लोक विधीपूर्वक जया एकादशीचे व्रत आणि पूजा करतात, त्यांना मृत्यूनंतर भूत, प्रेत, पिशाच इत्यादी योनीत जावे लागत नाही. ज्यांचे पूर्वज या योन्यांमध्ये कष्ट भोगत आहेत, ते आज जया एकादशीचे व्रत करून त्याचे पुण्य त्यांना दान करू शकतात, ज्यामुळे त्यांना मुक्ती मिळू शकते.
जया एकादशी मुहूर्त -
माघ शुद्ध एकादशी तिथीची सुरुवात: 28 जानेवारी, संध्याकाळी 4:35 वाजल्यापासून
माघ शुद्ध एकादशी तिथीची समाप्ती: 29 जानेवारी, दुपारी 1:55 वाजता
जया एकादशी पूजा मुहूर्त: सकाळी 07:11 ते सकाळी 08:32 पर्यंत
रवी योग: सकाळी 07:11 ते 07:31 पर्यंत
ब्रह्म मुहूर्त: सकाळी 05:25 ते 06:18 पर्यंत
अभिजित मुहूर्त: दुपारी 12:13 ते 12:56 पर्यंत
advertisement
जया एकादशी पारण: उद्या, सकाळी 7:10 ते सकाळी 9:20 पर्यंत
द्वादशी तिथीची समाप्ती: उद्या, सकाळी 11:09 वाजता
जया एकादशी पूजा मंत्र -
ओम नमो भगवते वासुदेवाय नम:
मंगलम् भगवान विष्णुः, मंगलम् गरुणध्वजः।
मंगलम् पुण्डरी काक्षः, मंगलाय तनो हरिः॥
ओम नमोः नारायणाय॥
advertisement
जया एकादशी व्रत आणि पूजा विधी -
आज सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. त्यानंतर हातात जल घेऊन जया एकादशी व्रत आणि विष्णू पूजेचा संकल्प करा. मग सूर्यदेवाला जल अर्पण करा आणि पूजेचे साहित्य एकत्र करा. नंतर शुभ मुहूर्तावर भगवान विष्णूंची स्थापना करा. त्यांना पंचामृताने स्नान घाला. त्यानंतर वस्त्र, फुले, माळ आणि चंदनाने त्यांना सुशोभित करा. मग अक्षता, पिवळी फुले, हळद, धूप, दीप, तुळशीची पाने, फळे इत्यादी अर्पण करून पूजन करा.
advertisement
यानंतर विष्णू चालीसा किंवा विष्णू सहस्रनामाचे पठण करा. जया एकादशीची व्रत कथा ऐका. मग तुपाचा दिवा लावून किंवा कापूर पेटवून विष्णूंची आरती करा. पूजेच्या शेवटी कळत-नकळत झालेल्या चुकांसाठी क्षमा प्रार्थना करा.
आज दिवसभर फलाहार करा आणि रात्री शक्य असल्यास जागरण करा. दुसऱ्या दिवशी म्हणजेच उद्या सकाळी स्नान करून पूजा आणि दान करा. त्यानंतर पारण करून व्रत पूर्ण करा. विष्णूंच्या कृपेने तुमचे कष्ट दूर होतील आणि मोक्ष प्राप्ती होईल.
advertisement
विष्णूंची आरती -
ओम जय जगदीश हरे, स्वामी! जय जगदीश हरे।
भक्त जनों के संकट, क्षण में दूर करे॥
ओम जय जगदीश हरे…
जो ध्यावे फल पावे, दुःख विनसे मन का।
सुख सम्पत्ति घर आवे, कष्ट मिटे तन का॥
ओम जय जगदीश हरे…
मात-पिता तुम मेरे, शरण गहूं मैं किसकी।
advertisement
तुम बिन और न दूजा, आस करूं जिसकी॥
ओम जय जगदीश हरे…
तुम पूरण परमात्मा, तुम अन्तर्यामी।
पारब्रह्म परमेश्वर, तुम सबके स्वामी॥
ओम जय जगदीश हरे…
तुम करुणा के सागर, तुम पालन-कर्ता।
मैं मूरख खल कामी, कृपा करो भर्ता॥
ओम जय जगदीश हरे…
तुम हो एक अगोचर, सबके प्राणपति।
किस विधि मिलूं दयामय, तुमको मैं कुमति॥
advertisement
ओम जय जगदीश हरे…
दीनबन्धु दुखहर्ता, तुम ठाकुर मेरे।
अपने हाथ उठा‌ओ, द्वार पड़ा तेरे॥
ओम जय जगदीश हरे…
विषय-विकार मिटा‌ओ, पाप हरो देवा।
श्रद्धा-भक्ति बढ़ा‌ओ, संतन की सेवा॥
ओम जय जगदीश हरे…
श्री जगदीशजी की आरती, जो कोई नर गावे।
कहत शिवानन्द स्वामी, सुख-संपत्ति पावे॥
ओम जय जगदीश हरे…
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
Jaya Ekadashi 2026: रवि योगात आज जया एकादशी; भूत, पिशाच योनितून मुक्तिचा दिवस, पूजा ​विधी, मुहूर्त-मंत्र
Next Article
advertisement
दुबईतून Gold खरेदीचे स्वप्न आता विसरा, एका घटनेमुळे पायाखालची जमीन सरकली; सोने आणणाऱ्यांना बसला मोठा झटका
दुबईतून Gold खरेदीचे स्वप्न आता विसरा, एका घटनेमुळे पायाखालची जमीन सरकली
  • दुबईत सोनं खरेदी करणं आता अशक्य

  • सामान्यांना मोठा झटका

  • सर्व गणितं कोलमडली

View All
advertisement