Mumbai BEST Elections Result: मुंबई ही आमचीच...! बेस्टच्या निकालानंतर शेलारांनी BMC साठी शड्डू ठोकला, ठाकरेंनाही डिवचलं

Last Updated:

Ashish Shelar Mumbai BEST Elections Result: भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी आता ठाकरेंना डिवचलं असून मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी शड्डू ठोकला आहे.

मुंबई ही आमचीच...! बेस्टच्या निकालानंतर शेलारांनी BMC साठी शड्डू ठोकला, ठाकरेंनाही डिवचलं
मुंबई ही आमचीच...! बेस्टच्या निकालानंतर शेलारांनी BMC साठी शड्डू ठोकला, ठाकरेंनाही डिवचलं
मुंबई: दि बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत ठाकरे ब्रँडला मोठा झटका बसला आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या कामगार संघटनांचा या निवडणुकीत धुव्वा उडाला. भाजप-शिंदे गटाच्या पॅनलला सत्ता मिळाली नसली तरी त्यांनी 7 जागांवर विजय मिळवला आहे. या निकालानंतर भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी आता ठाकरेंना डिवचलं असून मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी शड्डू ठोकला आहे.
बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवानंतर आता भाजपने आक्रमक सूर लावला आहे. या निवडणुकीत शशांक राव यांच्या बेस्ट वर्कर्स युनियनच्या पॅनलने 14 जागा तर महायुती समर्थित 'सहकार समृद्धी' पॅनलने 7 जागांवर विजय मिळवला. ठाकरे गट-मनसेच्या पॅनलचा धुव्वा उडाला.
भाजपचे मु्ंबई अध्यक्ष आणि राज्याचे मंत्री आशिष शेलार यांनी म्हटले की, बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीचा निकाल हा भाजपासाठी मुंबईकरांचा शुभसंकेत आहे. बेस्ट पतपेढीच्या निवडणूकीत मुंबईकर जिंकले, कामगार जिंकले. कामगारांनी आम्हाला शुभसंकेत दिला आणि "पत" आणि "पेढी"साठी लढणाऱ्यांच्या हाती मोठा भोपळा दिला असल्याचे शेलार यांनी म्हटले. मुंबईकर, कामगार, श्रमिक आमच्याबाजूने आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले असल्याचेही त्यांनी म्हटले.
advertisement

हा शुभ संकेत, मुंबई आमचीच!

आशिष शेलार यांनी म्हटले की, पक्ष म्हणून लढलो नाही पण आमचे प्रसाद लाड आणि शशांक राव विजयी झाले. हा तर मोठा शुभसंकेत असे त्यांनी नमूद केले.
advertisement
बॅलेट पेपरवर निवडणूका झाल्यावर हा विजय आम्हाला मिळाला आहे. त्यामुळे तमाम तथाकथित राजकीय विश्लेषक, मतचोरी झाले म्हणणारे तथाकथित तज्ञ आणि विश्वविख्यात प्रवक्त्यांपासून गल्लोगल्लीतल्या "निर्भय"वक्त्यांपर्यंत सगळे उघडे, नागडे झाले असल्याचे शेलार यांनी म्हटले. मुंबईकर ही आमचाच असून मुंबई ही आमचीच असल्याचे शेलारांनी म्हटले.

इतर संबंधित बातमी:

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mumbai BEST Elections Result: मुंबई ही आमचीच...! बेस्टच्या निकालानंतर शेलारांनी BMC साठी शड्डू ठोकला, ठाकरेंनाही डिवचलं
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement