टेकऑफनंतर इंजिनमध्ये गडबड, 160 प्रवाशांचा जीव टांगणीला, नागपुरात विमानाचं इमर्जन्सी लॅण्डिंग
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
नागपूर-दिल्ली AI ४६६ विमानाला पक्षी धडकला, वैमानिकाच्या समयसूचकतेमुळे १६० प्रवासी सुरक्षित. इंडिगो 6E-6961 विमानात इंधन गळती, वाराणसीत इमर्जन्सी लँडिंग, १६६ जण सुखरूप.
160 प्रवाशांचा जीव पुन्हा एकदा टांगणीला लागला होता. नागपूर विमानतळहून विमान दिल्लीसाठी रवाना झालं. मात्र पुढच्याच काही मिनिटांत असं काही घडलं की विमानाचं पुन्हा इमर्जन्सी लॅण्डिंग करावं लागलं. एअर इंडियाच्या नागपूर-दिल्ली AI ४६६ या विमानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून टेकऑफ केल्यानंतर लगेचच काही अंतरावर विमानाच्या इंजिनवर जोरात आवाज आला. विमानाला पक्षी धडकल्याचं समजतात तातडीनं वैमानिकानं पुन्हा लॅण्डिंग केलं. त्याने दाखवलेल्या समयसूचकतेमुळे कोणतीही मोठी दुर्घटना टळली.
इंजिनमध्ये गडबड झाल्याने घेतला निर्णय
शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजून ३८ मिनिटांनी या विमानाने नागपूर विमानतळावरून टेकऑफ केलं. विमान टेक ऑफ झाल्यावर लगेचच वैमानिकाच्या लक्षात आले की, विमानाच्या इंजिनमध्ये व्हायब्रेशन जाणवत आहेत. इंजिनमध्ये पक्षी धडकण्याची शक्यता व्यक्त करत , वैमानिकाने तातडीने विमान परत नागपूर विमानतळावर उतरवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे विमानातील सुमारे १६० प्रवाशांचा जीव वाचला.
advertisement
ट्रॅफिक कंट्रोलला दिली अपडेट
याची माहिती तातडीनं वैमानिकाने विमानतळावर दिली. एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) शी संपर्क साधला. हे विमान हिंगण्याच्या दिशेने निघालं होतं. तिथून पुन्हा नागपूर विमानतळाच्या दिशेनं वळवण्यात आलं. विमान सुरक्षितरित्या उतरल्यानंतर सर्व १६० प्रवाशांना विमानतळावर उतरवण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्व प्रवाशांना त्यांच्या तिकिटाची संपूर्ण रक्कम परत देण्याचा निर्णय एअर इंडियाने घेतला आहे. विमानाला पक्षी धडकण्याची घटना काही नवीन नाही. यापूर्वी देखील अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. मात्र वैमानिकाच्या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला.
advertisement
फ्यूल टँक लिक इंडिगोच्या विमानाचंही इमर्जन्सी लॅण्डिंग
view commentsकोलकाताहून श्रीनगरकडे निघालेल्या इंडिगोच्या 6E-6961 या विमानातील प्रवाशांना बुधवारी एका मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. 36000 फूट उंचावर विमानाचं उड्डाण सुरू असताना अचानक विमानाच्या इंधन टाकीतून गळती सुरू झाल्याचं लक्षात आलं. त्यानंतर तातडीने मेडे मेडे मेडे असा कॉल देत अवघ्या 4 मिनिटांत विमानाचं वाराणसीच्या लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. इंडिगोच्या 6E-6961 विमानात इंधन गळतीमुळे वाराणसीमध्ये इमर्जन्सी लँडिंग, पायलटच्या समयसूचकतेमुळे 166 प्रवासी आणि कर्मचारी सुखरूप, चौकशी सुरू आहे.
Location :
Nagpur,Nagpur,Maharashtra
First Published :
October 25, 2025 9:01 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
टेकऑफनंतर इंजिनमध्ये गडबड, 160 प्रवाशांचा जीव टांगणीला, नागपुरात विमानाचं इमर्जन्सी लॅण्डिंग


