Nagpur News : मोठी बातमी! नागपूरमधील दोन भागातील संचारबंदी हटवली, इतर ठिकाणचे काय?

Last Updated:

Nagpur News : नागपूर शहरातील दोन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील संचार बंदी पूर्णतः उठवली. तर, काही भागात संचार बंदीत शिथिलता आणली आहे.

News18
News18
उदय तिमांडे, प्रतिनिधी, नागपूर: नागपूर शहरातील महाल भागात उसळलेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी आता कठोर भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. नागपूर पोलिसांनी या दंगलीत सहभागी असलेल्या आरोपींना अटक करण्यास सुरुवात केली आहे. तर, दुसरीकडे नागपूर शहरातील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी पोलिसांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नागपूर शहरातील दोन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील संचार बंदी पूर्णतः उठवली. तर, काही भागात संचार बंदीत शिथिलता आणली आहे. तर, हिंसाचाराने होरपळलेल्या भागातील पोलीस स्टेशनमध्ये संचारबंदी जैसे थे ठेवण्यात आली आहे.

संचार बंदी पूर्णपणे कुठे उठवली?

18 मार्च रोजी रात्री सुरू झालेली संचारबंदी आज 20 तारखेच्या दुपारपासून म्हणजे आजपासून दुपारी 2 वाजल्यापासून नंदनवन आणि कपिल नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ठिकाणांवरील संचारबंदी पूर्णतः उठविण्यात येत आहे. संचार बंदी पूर्णपणे उठवल्याने स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

चार तासांची शिथिलता कुठे?

शांतीनगर, पाचपावली, लकडगंज , सक्करदरा, इमामवाडा, या भागात दैनंदिन जीवनात लोकांच जनजीवन सुरळीत राहावे यासाठी आढावा घेऊन आज पासून दोन वाजता पासून सायंकाळी 6 पर्यंत चार तासाकरिता शिथीलता देण्यात आली आहे. या भागातील संचार बंदीत 4 तासाची शिथिलता देण्यात आल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
advertisement

संचार बंदी कुठे कायम?

कोतवाली, तहसील आणि गणेश पेठ या भागात हिंसाचार झाला होता. त्यामुळे या पोलीस स्टेशन हद्दीतील संचारबंदी पुढील आदेशापर्यंत जशास तसा सुरू राहणार असल्याची माहिती नागपूर पोलिसांकडून देण्यात आली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nagpur News : मोठी बातमी! नागपूरमधील दोन भागातील संचारबंदी हटवली, इतर ठिकाणचे काय?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement