Nana Patole : 'माझा EVM वर आक्षेप नाही, तर...', नाना पटोलेंचं मोठं विधान
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
महायुतीच्या मुख्यमंत्रीपदावर बोलताना पटोले म्हणाले की, कोण मुख्यमंत्री ठरेल? याचा निर्णय भाजपचे राष्ट्रीय नेते निर्णय घेतील.त्यामुळे त्यावर आम्ही काय बोलणार नाही.
Nana Patole News : विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला कौल दिला आहे. त्यामुळे पराभूत झालेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ईव्हीएमवर खापर फोडायला सूरूवात केली आहे. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी निकालानंतर पत्रकार परिषद देऊन ईव्हीएममध्ये गडबडी झाल्याचा आरोप करत पुरावे सादर केले होते. यानंतर आता मविआचे नेते ईव्हिएमविरोधात आंदोलन पुकारणार आहेत.असे असतानाच आता काँग्रेस प्रदेशाध्यथक्ष नाना पटोले यांनी मोठं विधान केले आहे. माझा EVM वर आक्षेप नसल्याचे विधान नाना पटोलेंनी केले आहे. त्यामुळे पटोलेंच्या या विधानानंतर मविआच्या नेत्यांच्या भुवय्या उंचावल्या आहेत.
नाना पटोले पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी महायुतीच्या मुख्यमंत्रीपदावर बोलताना पटोले म्हणाले की, कोण मुख्यमंत्री ठरेल? याचा निर्णय भाजपचे राष्ट्रीय नेते निर्णय घेतील.त्यामुळे त्यावर आम्ही काय बोलणार नाही. नाना पटोले पुढे ईव्हिएमवर बोलताना म्हणाले की, माझा ईव्हिएम मशीनवर नाही तर निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणाली वर आक्षेप असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला पारदर्शी म्हटलं आहे, यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की,आमदार अपात्र प्रकरणाचा निर्णय 2 वर्ष लागत नाही. पण EVM चा निर्णय 2 तासात लावतात यावरून EVM वरच प्रेम लक्षात येते,असा टोला पटोलेंनी कोर्टाला लगावला. तसेच ही बाब आमच्या राष्ट्रीय नेतृत्वाने गांभिर्याने घेतली असून आज दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत,असे नाना पटोले यांनी सांगितले.
advertisement
जनतेची भीती सरकारच्या मनात नाही. कापूस, धान, सोयाबीन खरेदी केंद्र अद्याप सुरू झाली नाही. लोकांच्या मतापेक्षा मशीन सत्ताधाऱ्यांना प्रिय झाली ही व्यवस्था लोकशाहीसाठी घातक आहे. या विरोधात आम्ही न्यायालयीन लढाई लढणार असल्याचेही नाना पटोलेंनी सांगितले आहे. मुनगंटीवारला काय वाटत मला माहिती नाही. माझा मशीन वर नाही तर निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणाली वर आक्षेप आहे. निवडणूक आयोगाच्या पारदर्शिकतेवर आम्हाला आक्षेप आहे. निवडणूक आयोग पारदर्शी नाही हा माझा आरोप असल्याचे नाना पटोले म्हणाले आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 29, 2024 1:53 PM IST


