Nashik Crime News: एका फोन कॉलवर हलली सूत्र, हॉटेलच्या रुमवर पोलिसांची धाड, महिलेसह तिघांना पाहून बसला धक्का

Last Updated:

नाशिक शहरात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा नाशिक पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गुन्हे शाखा युनिट एकने अत्यंत गोपनीय पद्धतीने सापळा रचून या टोळीतील चार संशयितांना अटक केली आहे.

नाशिक ड्रग्ज प्रकरण
नाशिक ड्रग्ज प्रकरण
हॅलो....साहेब....फोन वाजला आणि त्यानंतर सगळी सूत्र हलली, तातडीनं पोलिसांच्या टीमने एका प्लॅन तयार केला, लगेच मिळालेल्या माहितीवर घटनास्थळी पोहोचून सापळा रचला. इथे हॉटेलच्या रूम मध्ये मात्र काहीतरी भलतंच घडत होतं. त्यांना बाहेर काय घडतंय याची कल्पना नव्हती. सापळा रचला आणि पोलिसांनी अचानक हॉटेलच्या रुमवर धाड टाकली. कुठलाही सुगावा लागू दिला नाही. रुममधील प्रकार पाहून मोठा धक्का बसला. मिळालेली टीम खरी निघाली आणि पोलिसांनी अक्षरश: तिघांच्या मानाच धरल्या.
नाशिक शहरात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा नाशिक पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गुन्हे शाखा युनिट एकने अत्यंत गोपनीय पद्धतीने सापळा रचून या टोळीतील चार संशयितांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 17 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
हॉटेलजवळ सापळा रचून मुख्य आरोपीला अटक
पोलिसांना गुप्त सूत्रांकडून माहिती मिळाली होती की, या ड्रग्स विक्री टोळीचा मुख्य संशयित आरोपी मुजफ्फार उर्फ मुज्जू शेख हा शहरातील एका प्रसिद्ध हॉटेलजवळ एमडी ड्रग्स विक्रीसाठी येणार आहे. या माहितीच्या आधारावर, गुन्हे शाखेच्या पथकाने हॉटेल परिसरात कडेकोट सापळा रचला. संशयित मुज्जू शेख तिथे पोहोचताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी त्याच्या तीन साथीदारांना देखील अटक केली.
advertisement
जप्त केलेल्या मुद्देमालात महिलेचाही सहभाग
अटक केलेल्या चार संशयितांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे, ज्यामुळे या टोळीच्या जाळ्याचा विस्तार अधिक असल्याचे स्पष्ट होते. पोलिसांनी या टोळीकडून एमडी ड्रग्स आणि ड्रग्स विक्रीसाठी वापरण्यात येणारे इतर साहित्य जप्त केले आहे, ज्याची एकूण किंमत १७ लाख १५ हजार रुपये इतकी आहे.
नाशिक शहराला अमली पदार्थमुक्त करण्याच्या दिशेने नाशिक पोलिसांनी उचललेले हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे. गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे शहरातील ड्रग्स पुरवठा साखळीला मोठा धक्का बसला आहे. पोलिस आता या टोळीच्या मुख्य पुरवठादाराचा आणि त्यांच्या नेटवर्कचा शोध घेत आहेत.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nashik Crime News: एका फोन कॉलवर हलली सूत्र, हॉटेलच्या रुमवर पोलिसांची धाड, महिलेसह तिघांना पाहून बसला धक्का
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement