Nashik : 'सारखी मोबाईल बघत बसते, कामच करत नाही', लग्नानंतर महिन्याभरातच 21 वर्षीय भाग्यश्रीने संपवलं आयुष्य!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Nashik Crime News : लग्नानंतर अवघ्या महिन्याभरातच 21 वर्षीय भाग्यश्रीने सासरच्या जाचाला कंटाळून आणि नवऱ्याच्या दुर्लक्षामुळे स्वत:ला संपवल्याचा प्रकार समोर आला आहे.
Nashik Crime News : पुण्यात वैष्णवी हगवणेच्या हुंडाबळीच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरलं असतानाच, नाशिकमधून आणखी एका नवविवाहितेच्या आत्महत्येची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. प्रेमविवाहानंतर अवघ्या महिन्याभरातच २१ वर्षीय भाग्यश्रीने सासरच्या जाचाला कंटाळून आणि नवऱ्याच्या दुर्लक्षामुळे विषारी औषध पिऊन जीवन संपवले. या घटनेने नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी नाशिकमध्येच भक्ती गुजराथी या तरुणीने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली होती. ही घटना ताजी असतानाच, आता भाग्यश्रीच्या आत्महत्येने हुंडाबळी आणि कौटुंबिक छळाच्या वाढत्या घटनांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
काय घडलं नेमकं?
मिळालेल्या माहितीनुसार, भाग्यश्रीने प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर अवघ्या महिन्याभरातच तिच्यावर सासूकडून छळाला सुरुवात झाली. "घरातील काम नीट करत नाहीस, जास्त बोलत नाहीस, सतत मोबाईल बघतेस," अशा तुच्छ बोलण्याने तिला मानसिक त्रास दिला जात होता. महत्त्वाचे म्हणजे, ज्याच्यावर जीवापाड प्रेम करून भाग्यश्रीने लग्न केले होते, तो तिचा नवरा या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष करत होता. पतीकडून साथ न मिळाल्याने भाग्यश्री पूर्णपणे एकाकी पडली होती. या नैराश्यातूनच तिने टोकाचे पाऊल उचलले.
advertisement
आईचा हृदयद्रावक अनुभव
आत्महत्या केलेल्या भाग्यश्रीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, "२७ मे रोजी भाग्यश्रीने मला फोन केला होता. 'सासू आणि नवरा सारखं बोलतात. नवरा माझी बाजू घेत नाही. मी एकाकी पडले आहे,' असे सांगून तिनं फोन ठेवला. त्याच रात्री नऊ वाजता तिने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली." भाग्यश्रीच्या सासरच्यांनी तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
advertisement
सासू आणि नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल
या प्रकरणी भाग्यश्रीच्या आईने आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी भाग्यश्रीच्या नवऱ्यासह सासूविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तातडीने नवऱ्यासह सासूला अटक केली आहे. पुण्यातून सुरू झालेल्या हुंडाबळीच्या घटनांची मालिका आता नाशिकपर्यंत पोहोचली आहे. भाग्यश्रीच्या आत्महत्येने पुन्हा एकदा समाजात मुलींवर होणाऱ्या अन्यायाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
view commentsLocation :
Nashik,Maharashtra
First Published :
May 30, 2025 12:17 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik : 'सारखी मोबाईल बघत बसते, कामच करत नाही', लग्नानंतर महिन्याभरातच 21 वर्षीय भाग्यश्रीने संपवलं आयुष्य!