स्पा सेंटरच्या नावाखाली शरीराचा सौदा, नाशकात 5 तरुणींसोबत नको तो प्रकार
- Published by:Ravindra Mane
- Reported by:Laxman Ghatol
Last Updated:
Crime in Nashik: नाशिक शहरातील मुंबईनाका परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका उच्चभ्रू परिसरात 'स्पा' सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या देहविक्री सुरू होती.
लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी नाशिक: नाशिक शहरातील मुंबईनाका परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका उच्चभ्रू परिसरात 'स्पा' सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या देहविक्रीच्या रॅकेटचा मध्यवर्ती गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी पाच पीडित तरुणींची सुटका केली असून, मुख्य आरोपी महिलेला अटक केली आहे.
मुंबईनाका येथील एका नव्या व्यावसायिक संकुलात 'आरंभ स्पा' नावाने हे मसाज पार्लर चालवले जात होते. येथे काही तरुणींना देहविक्री करण्यास भाग पाडले जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुरुवारी रात्री पोलिसांनी या स्पावर छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी दिल्ली, कानपूर, बिहार आणि मिझोराम येथील पाच तरुणींची सुटका केली.
advertisement
याप्रकरणी पोलिसांनी खुशबू सुराणा नावाच्या महिलेला ताब्यात घेऊन अटक केली आहे. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, खुशबू सुराणा हिच्यावर यापूर्वीही अनैतिक देहविक्रय आणि अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी 'पॉक्सो' कायद्यांतर्गत गुन्हे दाखल आहेत.
या कारवाईनंतर मुंबईनाका पोलीस ठाण्यात खुशबू सुराणा विरोधात पुन्हा एकदा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. 'स्पा'च्या नावाखाली चालणाऱ्या या गैरकृत्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
view commentsLocation :
Nashik,Maharashtra
First Published :
August 22, 2025 9:04 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
स्पा सेंटरच्या नावाखाली शरीराचा सौदा, नाशकात 5 तरुणींसोबत नको तो प्रकार