'अनेकांना प्रश्न पडला, मुलाचं तिकीट कसं मागायचं?' नितीन गडकरींची जोरदार टोलेबाजी
- Published by:Prachi Amale
Last Updated:
कार्यकर्त्यालाही एकट्यात बसून समजावून सांगितलं पाहिजे, कार्यकर्त्यांवर मुलाप्रमाणे प्रेम केलं पाहिजे, असे नितीन गडकरी म्हणाले.
मुंबई : भाजप कार्यालयाच्या भूमिपूजनावेळी नितीन गडकरींनी त्यांच्या खास शैलीत भाष्य करत मिश्किल टोला लगावलाय. नेत्यांचं मुलावर प्रेम आहे हे सांगायची गरज नाही, मात्र मी माझ्या मुलाचा आग्रह करत नाही म्हणून अनेकांना प्रश्न पडाला की तिकीट कसं मागायचं, असा टोला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिला आहे.
भाजपच्या कार्यालयाच्या भूमिपूजनावेळी नितीन गडकरींनी त्यांच्या खास शैलीत भाष्य केलं. आपला पक्ष हा आपला परिवार आहे आणि कार्यकर्ता हा परिवारासारखा आहे असं नेत्यांनी वागावं असा सल्ला गडकरींनी यावेळी नेत्यांना दिला. तसेच नेत्यांचं प्रेम आपल्या मुलांवर आहे हे सांगायची गरज नाही, तसेच मुलाला तिकीट द्या असं अनेकजण म्हणतात. मात्र मी माझ्या मुलाचा आग्रह करत नाही म्हणून अनेकांना प्रश्न पडला की माझ्या मुलासाठीचं तिकीट कसं मागायचं? असा मिश्किल टोला गडकरींनी लगावलाय.
advertisement
अनेकांना प्रश्न पडला, मुलाचं तिकीट कसं मागायचं? : नितीन गडकरी
आपला पक्ष आपला परिवार कार्यकर्ता हा परिवारासारखा आहे असं नेत्यांनी वागावं. नेत्यांचं प्रेम आपल्या मुलांवर आहे हे सांगायची गरज नाही. मुलाप्रमाणे कार्यकर्त्यांवर प्रेम जर केलं आणि कार्यकर्त्याला स्वीकारलं पाहिजे. कार्यकर्त्यालाही एकट्यात बसून समजावून सांगितलं पाहिजे, कार्यकर्त्यांवर मुलाप्रमाणे प्रेम केलं पाहिजे, असे नितीन गडकरी म्हणाले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 06, 2025 3:38 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'अनेकांना प्रश्न पडला, मुलाचं तिकीट कसं मागायचं?' नितीन गडकरींची जोरदार टोलेबाजी