कोल्हापूरचे कर्मयोगी गेले, अणुशास्त्रज्ञ पद्मश्री शिवराम भोजे यांचे निधन
- Published by:Prachi Amale
- Reported by:Dnyaneshwar Pandurang Salokhe
Last Updated:
संशोधन आणि विकासातील योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
कोल्हापूर: ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मश्री डॉ शिवराम भोजे यांचे आज कोल्हापुरात निधन झाले आहे. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरातल्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.त्यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली असा परिवार आहे. संशोधन आणि विकासातील योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
कागल तालुक्यातील सांगावच्या असलेल्या शिवराम भोजे यांनी अणुक्षेत्राच्या संशोधनात भरीव काम केले होते.विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी भारत सरकारने २००३ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. डॉ. भोजे हे ४० वर्षे वेगवान ब्रीडर अणुभट्टी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत होते. अणुशास्त्रज्ञ म्हणून इंदिरा गांधी सेंटर फॉर अॅटोमिक रिसर्चचे संचालक होते. सेवानिवृत्तीवर विविध शैक्षणिक संस्थाशी संबंध होता.
advertisement
अणुशास्त्रज्ञ म्हणून देशासाठी त्यांनी मोठे योगदान
डॉ. भोजे यांचा 9 एप्रिल 1942 रोजी झाला होता, त्यांचे प्राथमिक शिक्षण कसबा सांगव नंतर कागलमध्ये झाले. त्यांचे उच्च शिक्षण राजाराम कॉलेजमध्ये घेतले. अणुशास्त्रज्ञ म्हणून देशासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे. संशोधक, शास्त्रज्ञ म्हणून त्यांचा मोठा लौकिक होता. सेवानिवृत्तीनंतर ते कोल्हापुरात स्थायिक झाली,
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
September 16, 2025 9:20 PM IST