संभाजीनगरमध्ये भाजप उमेदवारांच्या विजयावर आक्षेप, वंचितचे कार्यकर्ते, महिला रस्त्यावर; वातावरण तापलं
- Published by:Prachi Amale
Last Updated:
संभाजीनगरमध्ये चुकीच्या पद्धतीने विजय घोषित झाल्याचा आरोप करत पराभूत उमेदवाराच्या समर्थकांनी आज पुन्हा आक्रमक पवित्र घेतला.
अविनाश कानडजे, छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर : राज्यातील 29 महापालिकांचा निकाल समोर आला आहे. काही ठिकाण आक्षेप घेतल्याने गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. संभाजीनगरमधील मुकुंदवाडी परिसरात पराभवाचा वाद पुन्हा उफाळून आला आहे. चुकीच्या पद्धतीने विजय घोषित झाल्याचा आरोप करत पराभूत उमेदवाराच्या समर्थकांनी आज पुन्हा आक्रमक पवित्र घेतला.
वंचित बहुजन आघाडीच्या संतप्त कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली असताना, परिस्थिती शांत करण्यासाठी सुजात आंबेडकर यांनी थेट फोनवरून संवाद साधला. आमदार नारायण कुचे यांच्या बहिणीला विजयी घोषित केल्यानंतरच या निकालावर वंचित कार्यकर्त्यांनी तीव्र आक्षेप घेतला होता. आमदार नारायण कुचे यांच्या बहिणीला विजयी केल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला होता .
advertisement
काय म्हणाले सुजात आंबेडकर?
मुकुंदवाडी परिसरात वंचित बहुजन आघाडीच्या पराभूत उमेदवाराच्या समर्थकांशी पक्षाचे नेते सुजात आंबेडकर फोनवरून संवाद साधत साधला आहे. उमेदवार विजयी असताना पराभूत दाखवणे हा अन्याय आहे. लोकशाही वर हा घाव आहे. मात्र या पुढची लढाई आपण कायदेशीर मार्गाने लढवू आणि न्याय मिळवू असा विश्वास सुजात आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना दिला. उमेदवाराला चुकीच्या पद्धतीने विजयी घोषित करण्यात आल्याच्या आरोपावरून काल समर्थकांनी आक्षेप नोंदवला होता. मोठा गोंधळ देखील उडाला होता. प्रभाग क्रमांक 24 मध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सतीश गायकवाड यांच्या विरोधात भाजपच्या आमदार नारायण कुचे यांच्या बहिणीला विजयी घोषित केल्यानंतर हा वाद निर्माण झाला होता. आता वंचित नेते सुजात आंबेडकर कडून कार्यकर्त्यांना धीर दिला जात आहे.
advertisement
नेमकं काय आहे प्रकरण?
छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान प्रभाग 24 मध्ये प्रचंड तणावाचे वातावरण काल निर्माण झाले होते. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सतीश गायकवाड यांनी 8 व्या फेरीपर्यंत अडीच हजार मतांची आघाडी घेतली असताना, आमदार नारायण कुचे यांनी मतमोजणी कक्षात शिरून निकाल फिरवल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला होता. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर अडीच तास ठिय्या मांडत जोरदार घोषणाबाजी केली होती. दरम्यान या आज देखील मोठ्याप्रमाणात लोक जमले असून, पुढील आंदोलनबाबत बैठक करण्यात येत आहे.
advertisement
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 17, 2026 3:30 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
संभाजीनगरमध्ये भाजप उमेदवारांच्या विजयावर आक्षेप, वंचितचे कार्यकर्ते, महिला रस्त्यावर; वातावरण तापलं









