'मारेकरी माझ्या पोटचे असते तर..', संतोष देशमुखांच्या आईची माफी मागताना पंकजा मुंडे म्हणाल्या...
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Santosh Deshmukh Murder: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राचं राजकीय वातावरण तापलं आहे. यावर आता पंकजा मुंडेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राचं राजकीय वातावरण तापलं आहे. देशमुख यांच्या हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अजित पवार गटाचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला आहे. या सगळ्या प्रकरणावर आता धनंजय मुंडेंच्या भगिनी आणि भाजपच्या आमदार पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका मांडली आहे.
त्यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करत, देशमुखांच्या आईची जाहीर माफी मागितली आहे. संतोष देशमुख यांच्या खूनाचे अमानुष फोटोंवर प्रतिक्रिया देताना पंकजा मुंडे म्हणाल्या, मी इन्स्टाग्रामवर काही व्हिडीओज आणि पोस्ट पाहिले. पण ते उघडून बघायची माझी हिंमत देखील झाली नाही. ज्यांनी संतोष देशमुखांना इतक्या अमानुषपणे मारलंय. एवढं मारूनही त्याचा व्हिडीओ काढलाय. त्यांच्याच जी निर्मनुष्यता आहे, ती माझ्यामध्ये नाही. त्यामुळे ते फोटो बघायची माझी हिंमत नाही."
advertisement
पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या, "संतोष देशमुखांच्या हत्येनंतर मी पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होतं. त्यानंतर १२ डिसेंबरला मी या प्रकरणावर पूर्णपणे व्यक्त झाली आहे. आता यात कोण आहे, कोण नाही, कोणाचा हात आहे, हे केवळ तपास यंत्रणांना माहीत आहे. यात मी कुठलाही हस्तक्षेप करायचं काहीही कारण नाही. ज्या मुलांनी ही हत्या केलीय. या मुलांमुळे सगळ्या राज्यातील समाजाला काहीही दोष नसताना मान खाली घालून वावरावं लागत आहे."
advertisement
यावेळी पंकजा मुंडे यांनी संतोष देशमुखांच्या आईची हात जोडून माफी मागितली आहे. संतोष देशमुखांच्या हत्येचा निषेध व्यक्त करताना, मी त्यांच्या आईची मनापासून क्षमा मागते. ज्या मुलांनी ही निर्घृण हत्या केलीय, ते माझ्या पदरात असते, माझ्या पोटचे असते तरी मी हेच म्हणले असते की, त्यांना कडक शासन करा. यापलीकडे कोणताही राजकीय नेता वेगळं भाष्य करू शकणार नाही, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.
Location :
Bid,Maharashtra
First Published :
March 04, 2025 1:03 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'मारेकरी माझ्या पोटचे असते तर..', संतोष देशमुखांच्या आईची माफी मागताना पंकजा मुंडे म्हणाल्या...