धनुभाऊची मी लहान बहीण, राजीनामा घेणाऱ्यांनी आधीच..., पंकजांनी अजितदादा-फडणवीसांना वादात ओढलं!
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. पंकजा मुंडे यांनी या राजीनाम्याचे स्वागत केले आणि तो आधीच व्हायला हवा होता असे म्हटले.
बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राचं राजकीय वातावरण तापलं आहे. देशमुख यांच्या हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अजित पवार गटाचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला आहे. या सगळ्या प्रकरणावर आता धनंजय मुंडेंच्या भगिनी आणि भाजपच्या आमदार पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका मांडली आहे.
धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला, याचं मी स्वागत करते. पण हा राजीनामा आधीच व्हायला पाहिजे होता, असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलं आहे. शिवाय त्यांनी या राजीनामानाट्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही वादात ओढलं आहे. राजीनामा घेणाऱ्यांनी देखील आधीच राजीनामा घ्यायला पाहिजे होता, असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलं.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर भाष्य करताना पंकजा मुंडे म्हणाल्या, "धनंजय मुंडेंचा राजीनामा झालाय. त्याचं मी स्वागत करते. पण हा राजीनामा आधीच व्हायला पाहिजे होता. राजीनामा होण्याआधी त्यांचा शपथविधीच व्हायला नको होता. तसं झालं असतं तर कदाचित पुढच्या गोष्टींना सामोरं जावं लागलं नसतं. राजीनामा घेणाऱ्यांनी देखील आधीच राजीनामा घ्यायला पाहिजे होता.
advertisement
"धनंजय मुंडेचं राजीनाम्याबद्दल काय स्टेटमेंट आहे, हे मला माहीत नाही. मी त्याची लहान बहीण असले तरी आम्ही वेगवेगळ्या पक्षात काम करतो. कुठल्याही बहिणीला वाटत नाही की, तिच्या कुटुंबातील सदस्याला अशा दु:खातून जावं. पण जेव्हा आपण दूरचा विचार करतो. तेव्हा राज्यातील प्रत्येकाचा सारखा विचार करावा लागतो. त्या पोराच्या, परिवाराच्या वेदनांपुढे हा राजीनामा म्हणजे काहीही मोठा निर्णय नाही. धनंजयने घेतलेला निर्णय योग्यच आहे, असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलं.
Location :
Bid,Maharashtra
First Published :
March 04, 2025 1:59 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
धनुभाऊची मी लहान बहीण, राजीनामा घेणाऱ्यांनी आधीच..., पंकजांनी अजितदादा-फडणवीसांना वादात ओढलं!