शरीरावर जखमा, नग्र अवस्थेत पडलेली, हात पाय बांधलेल्या अवस्थेत, रत्नागिरीत वृद्ध महिलेची हत्या
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Ratnagiri Crime: महिलेचा मृत्यू संशयास्पद असल्याने पोलीस सीसीटीव्ही फुटेज शोधत होते. मात्र आरोपीने सीसीटीव्ही फुटेजची हार्ड डिस्क चोरून नेली आहे.
राजेश जाधव, रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये वृद्ध महिलेच्या हत्येची थरारक घटना समोर आली आहे. चिपळूण जवळील धामणवणे गावातील रावतळे येथे एका ६८ वर्षे वयाच्या वृद्ध महिलेचा नग्न अवस्थेत हातपाय बांधलेला आणि अंगावर जखमा असलेला मृतदेह सापडल्याने एकच खळबळ माजली आहे.
महिलेच्या घराशेजारील एका व्यक्तीने चिपळूण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक राजमाने आणि अधीक्षक बगाटे हे घटनास्थळी दाखल झाले असून रत्नागिरीतील डॉग स्कॉडही पाचारण केले आहे. पोलिसांनी मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवला आहे.
महिलेचा मृत्यू संशयास्पद असल्याने पोलीस सीसीटीव्ही फुटेज शोधत होते. मात्र आरोपीने सीसीटीव्ही फुटेजची हार्ड डिस्क चोरून नेली आहे. महिला आज कुठे तरी बाहेरगावी जाणार होती. तिचा फोन कुणीही उचलत नाही म्हणून गाडी चालकाने घराशेजारील व्यक्तीला फोन लावला. आजी फोनला प्रतिसाद का देत नाही, हे पाहण्यासाठी जेव्हा शेजारी घरी गेले त्यावेळी त्यांना मृतदेह दिसून आला.
advertisement
शेजारच्यांनी पोलिसांनी तत्काळ फोन करून घटनेची माहिती दिली. नजीकच्या चिपळूण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करून पोलीस उपअधीक्षक राजमाने आणि पोलीस अधीक्षक बगाटे हे घटनास्थळी दाखल झाले असून रत्नागिरीतील डॉग स्कॉडही दाखल झाले आहे.
या वृद्ध महिलेचे नाव वर्षा वासुदेव जोशी असून त्या निवृत्त शिक्षिका होत्या. मुले नसल्याने आणि नवऱ्याचे अकाली निधन झाल्याने त्या घरी एकट्याच राहत होत्या. त्यांच्या हत्येने चिपळूण शहरात खळबळ माजली आहे. मारेकऱ्यांनी सीसीटीव्हीची हार्ड डिस्क चोरून नेल्याने पोलिसांना तपासामध्ये अडथळा निर्माण होत आहे.
Location :
Ratnagiri,Maharashtra
First Published :
August 07, 2025 5:02 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शरीरावर जखमा, नग्र अवस्थेत पडलेली, हात पाय बांधलेल्या अवस्थेत, रत्नागिरीत वृद्ध महिलेची हत्या