VIDEO: पाण्याचा प्रचंड वेग, खोलीचा अंदाज घ्यायला चुकले, रत्नागिरीत गणपती विसर्जनावेळी 3 तरुणांसोबत घडला अनर्थ

Last Updated:

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात गणेश विसर्जनाच्यावेळी एक दुर्दैवी घटना घडली आहे. दीड दिवसांच्या गणपती बाप्पाचे विसर्जन करत तिघांसोबत अनर्थ घडला आहे.

News18
News18
चंद्रकांत बनकर, प्रतिनिधी खेड: रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात गणेश विसर्जनाच्यावेळी एक दुर्दैवी घटना घडली आहे. दीड दिवसांच्या गणपती बाप्पाचे विसर्जन करत असताना भोस्ते येथील जगबुडी नदीपात्रात पाण्याचा अंदाज न आल्याने तीन तरुण गणेशभक्त वाहून गेले. यातील दोघे पोहत-पोहत सुखरूप बाहेर आले, मात्र एक तरुण अद्याप बेपत्ता आहे. मागील २४ तासांपासून त्याचा शोध सुरू असून, बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश विसर्जनासाठी काही तरुण जगबुडी नदीत उतरले होते. मात्र पाण्याचा प्रवाह आणि खोलीचा अंदाज न आल्याने तिघेही अचानक वाहून जाऊ लागले. त्यापैकी दोघे कसेबसे पोहून नदीतून बाहेर आले, पण एक जण पाण्याच्या प्रवाहात दिसेनासा झाला.
या घटनेचा एक लाईव्ह व्हिडिओ नदीच्या पलीकडील एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये शूट केला असून, त्यात तरुण पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जाताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाच्या काळजाचा थरकाप उडवणारा आहे.
advertisement
या घटनेची माहिती मिळताच तातडीने रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. इंडिया लिफ्टचं पथक गेल्या २४ तासांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा शोध घेत आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलीस या शोधकार्यात मदत करत आहेत. मात्र, अद्याप त्याला यश आलेले नाही.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
VIDEO: पाण्याचा प्रचंड वेग, खोलीचा अंदाज घ्यायला चुकले, रत्नागिरीत गणपती विसर्जनावेळी 3 तरुणांसोबत घडला अनर्थ
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement