Rohit Pawar On Manikrao Kokate : कोकाटेंकडून कोर्टात खेचण्याचा इशारा, इकडं रोहित पवारांनी नवा व्हिडीओ समोर आणला

Last Updated:

Rohit Pawar On Manikrao Kokate : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी कोकाटे यांचा दुसरा व्हिडीओ समोर आणला. रोहित पवारांनी 42 सेंकदाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

कोकाटेंकडून कोर्टात खेचण्याचा इशारा, इकडं रोहित पवारांनी नवा व्हिडीओ समोर आणला
कोकाटेंकडून कोर्टात खेचण्याचा इशारा, इकडं रोहित पवारांनी नवा व्हिडीओ समोर आणला
नाशिक: माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात बसून रमी खेळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर सर्वच क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. आपल्याला रमी खेळता येत नसल्याचा दावा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज नाशिकमधील पत्रकार परिषदेत केला. आपल्याविरोधात आरोप करणाऱ्यांना आपण कोर्टात खेचणार असल्याचा इशारा कोकाटे यांनी दिला. तर, दुसरीकडे आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी कोकाटे यांचा दुसरा व्हिडीओ समोर आणला. रोहित पवारांनी 42 सेंकदाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत सभागृहाचे कामकाज सुरू असल्याचे आवाजावरून दिसून आले आहे.

कोकाटेंचा कोर्टात खेचण्याचा इशारा...

आज नाशिकमधील पत्रकार परिषदेत माणिकराव कोकाटे यांनी म्हटले की, मी एक रुपयाची रमी खेळलेली नाही, मला रमी खेळताच येत नाही. त्यामुळे माझ्यावरील आरोप बिनबुडाचे आहेत. त्यामुळे ज्यांनी माझी बदनामी केली आहे, त्यांना मी कोर्टात खेचणार असल्याचे कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले. मी गेम स्कीप केल्याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलाच नाही, तो दाखवला गेला नाही. पूर्ण व्हिडीओ दाखवला असता तर माझ्यावरील आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही, हे स्पष्ट झाले असते, असा दावा कोकाटे यांनी केला होता.
advertisement

रोहित पवारांकडून आणखी एक वार...

माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत आरोप करणाऱ्यांना कोर्टात खेचणार असल्याचा इशारा दिल्यानंतर रोहित पवारांनी कोकाटेंना पुन्हा प्रतिआव्हान दिले. रोहित पवारांनी म्हटले की, सभागृहाचं कामकाज संपलं होतं हे कृषिमंत्री महोदयांचं विधान धडधडीत खोटं आहे. उलट विकासाच्या मूळ प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी बांधवांना दुधाळ जनावरं देण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सभागृहात चर्चा सुरु होती, पण ‘ओसाड गावच्या पाटलांना’ या चर्चेत रस नसावा असे म्हणत मला सांगा पत्त्याची कोणती जाहिरात skip करण्यासाठी 42 सेकंद लागतात हो? असा उलट सवाल केला.
advertisement
advertisement
विझताना दिव्याची ज्योत मोठी होते, तसंच काहीसं कोकाटे साहेबांचं झालंय.. आज राजीनामा देऊन शेतकऱ्यांवर ते उपकार करतील, असं वाटत होतं पण ‘गिरे तो भी टांग उपर’ अशी त्यांनी भूमिका घेत कोर्टात जाण्याची भाषा केली, हे दुर्दैव आहे. मंत्री महोदय स्वतःला वाचवण्यासाठी आज जेवढा खटाटोप करत आहेत त्यापेक्षा दिलेल्या पदाला न्याय देण्यासाठी केला असता तर ही वेळ आली नसती असे रोहित पवारांनी म्हटले.
advertisement

नाईलाजाने जनतेच्या कोर्टात...

विधिमंडळाची अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून आवाज असलेले हे व्हिडिओ शेअर करणं मी टाळत होतो, पण मंत्री महोदयांनी कोर्टात जाण्याची भाषा केल्याने नाईलाजाने मला सत्य जनतेच्या कोर्टात आणावं लागतंय, असं रोहित पवारांनी म्हटले. आता चौकशी करायचीच तर कृषीमंत्री पत्ते खेळत होते की नाही याचीही चौकशी करावी आणि ही चौकशी निष्पक्ष पद्धतीने होण्यासाठी नैतिकता दाखवून कोकाटे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली.
advertisement

इतर संबंधित बातमी:

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Rohit Pawar On Manikrao Kokate : कोकाटेंकडून कोर्टात खेचण्याचा इशारा, इकडं रोहित पवारांनी नवा व्हिडीओ समोर आणला
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement