Sadabhau Khot : पडळकरांसाठी सदाभाऊंच्या डोळ्यात पाणी, ''रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत....'', Video
- Published by:Shrikant Bhosale
- Reported by:ASIF MURSAL
Last Updated:
Sadabhau Khot : आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासाठी बोलताना आमदार सदाभाऊ खोत यांच्या डोळ्यात अश्रू आले
सांगली: राजकारणातील मैत्रीचे अनेक किस्से लोकांपर्यंत येतात. या नेत्यांचे पक्ष भिन्न असले तरी त्यापलिकडे मैत्रीचे नाते घट्ट असते, याची काही उदाहरणे राज्याच्या राजकारणात दिसून आले. आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासाठी आमदार सदाभाऊ खोत यांच्या डोळ्यात अश्रू आले. एका कार्यक्रमात गोपिचंद पडळकर यांच्याबाबत बोलताना सदाभाऊ अचानक भावूक झाले. आपण शेवटपर्यंत गोपिचंद पडळकरांची साथ सोडणार नसल्याचे त्यांनी म्हटले.
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव मधील बिरोबा मंदिर सभा मंडप उद्घाटन प्रसंगी सदाभाऊ खोत बोलत होते. यावेळी आमदार गोपिचंद पडळकर यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सदाभाऊ खोत आणि गोपिचंद पडळकर यांची मैत्री ठळकपणे दिसून आली होती. दोन्ही नेत्यांनी एसटी कर्मचाऱ्यांसोबत आझाद मैदानात ठाण मांडले होते.
सदाभाऊ खोत आपल्या भाषणात म्हणाले की, मी आणि गोपीचंद पडळकर सर्व जातीला घेऊन प्रस्थापितांच्या विरोधात आम्ही लढलो. विरोधकांना आमच्याबद्दल राग आहे. आम्ही त्यांच्या विरोधात लढलो. पण शेवटच्या क्षणापर्यंत आणि माझ्या शरीरात रक्ताचा थेंब असेपर्यंत शेवटच्या थेंबापर्यंत मी गोपीचंद पडळकर समवेत असेन. असे सांगत आमदार सदाभाऊ खोत यांना भावना अनावर झाल्याने त्यांच्या डोळ्यात अश्रू आले.
advertisement
आमदार गोपिचंद पडळकर यांना साथ दिली नाही तर आम्हा दोघांनाही विरोधक नैवेद्यालाही शिल्लक ठेवणार नाहीत, असेही खोत म्हणाले.
view commentsLocation :
Sangli,Maharashtra
First Published :
August 24, 2025 2:53 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sadabhau Khot : पडळकरांसाठी सदाभाऊंच्या डोळ्यात पाणी, ''रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत....'', Video


