Sanjay Raut On Narayan Rane : ठाकरेंनी नव्हे तर राणे कुटुंबीयांनी फोन केलेला, राऊतांचा गौप्यस्फोट, ''अशा गोष्टी...''

Last Updated:

Sanjay Raut On Narayan Rane : उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला नव्हता. पण, राणे कुटुंबीयांकडून फोन आले होते, असे संजय राऊत यांनी म्हटले.

News18
News18
मुंबई : आदित्य ठाकरेंचे नाव घेऊ नये यासाठी उद्धव ठाकरेंनी फोन केल्याचा दावा खासदार नारायण राणे यांनी केला होता. मात्र, या दाव्यात तथ्य नसल्याचे सांगत ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी मोठा गौप्यस्फोट केला. उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला नव्हता. पण, राणे कुटुंबीयांकडून फोन आले होते, असे संजय राऊत यांनी म्हटले.
एका प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव घेऊ नये अशी विनंती करणारे दोन फोन कॉल उद्धव ठाकरे यांनी केले होते, असा दावा माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी केला होता. त्यावर आज शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण देत नवा गौप्यस्फोट केला.

उद्धव ठाकरेंनी फोन कॉल केलाच नाही...

advertisement
संजय राऊत यांनी म्हटले की, माझी या विषयावर उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली, असे काही घडले, याचा पूर्णपणे त्यांनी इन्कार केला. कोणताही फोन यासंदर्भात नारायण राणे यांना झाला नाही आणि हे संभाषण झाले नाही, असे त्यांनी म्हटले. मिलिंद नार्वेकर यांच्याशी देखील माझे बोलणं झालं. अशा प्रकारचे कोणतेही संभाषण झाले नाही, असेही नार्वेकरांनी सांगितले. नारायण राणे हे कोणत्या आधारावर वक्तव्य करत आहेत, त्यांची प्रकृती बरी नाही का, असा सवालही त्यांनी केला.
advertisement

राणे कुटुंबीयांचा मात्र ठाकरेंना फोन...

संजय राऊत यांनी नारायण राणेंच्या दाव्यावर पलटार करताना राणे कुटुंबीयांचेच ठाकरेंना फोन आले होते ,असा दावा केला आहे. केंद्रीय मंत्री असताना नारायण राणे यांना मुख्यमंत्र्यावर आक्षेपार्ह टीका केल्याने अटक करण्यात आली होती. त्यावेळी नारायण राणे यांच्या कुटुंबीयांनी उद्धव ठाकरेंना फोन केले होते. नारायण राणे यांना सांभाळून घ्या, त्यांची प्रकृती बरी नाही, त्यांना काही विकार आणि त्रास आहेत. त्यानंतर संध्याकाळी उद्धव साहेबांनी पोलिसांना सूचना देऊन त्यांची सुटका करायला लावली होती असा दावा संजय राऊत यांनी केला.
advertisement
नारायण राणे यांच्यासाठी केंद्रातूनही फोन आले. अमित शाह यांनीदेखील फोन कॉल केले. केंद्रीय मंत्री आहेत. त्यांच्या कुटुंबीयांचे फोन होते. आता या गोष्टी काढायच्या असतात का? आता तुम्ही काढले त्यामुळे आम्हाला सांगावं लागलं. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. वैयक्तिक चर्चा अशाप्रकारे खोटा मुलामा लावून 5-10 वर्षांनी बाहेर काढल्या जात आहेत. असे काढायचे असेल तर प्रत्येकाचे काहीतरी असते असे सूचक वक्तव्यही राऊत यांनी केले.
advertisement

भाजपचे राज्य आल्यापासून दळभद्री राजकारण

संजय राऊत यांनी पुढे म्हटले की, महाराष्ट्रात असे वातावरण कधी नव्हते. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात संवाद कायम होता. कोणतीही कारवाई कुटुंबापर्यंत जात नव्हती. कुटुंबाची बदनामी होत नव्हती. दुर्दैवाने गेल्या 10 वर्षात नरेंद्र मोदी, अमित शाह यांचे राज्य आल्यापासून असे दळभद्री राजकारण सुरू झाले आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sanjay Raut On Narayan Rane : ठाकरेंनी नव्हे तर राणे कुटुंबीयांनी फोन केलेला, राऊतांचा गौप्यस्फोट, ''अशा गोष्टी...''
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement