Santosh Deshmukh Case : संतोष देशमुखांना टॉर्चर करून मारलं, त्यांच्या शरीरावर 56..., हत्या प्रकरणात पवारांच्या खासदाराने उडवली खळबळ
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
Santosh Deshmukh Case Update : बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणावरून संपूर्ण महाराष्ट्र पेटलाय. देशमुख हत्या प्रकरणात आता नवनवीन खुलासे समोर येत आहेत. त्यात आता या प्रकरणात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मोठा खुलासा केला आहे.
Santosh Deshmukh Case Update : बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणावरून संपूर्ण महाराष्ट्र पेटलाय. देशमुख हत्या प्रकरणात आता नवनवीन खुलासे समोर येत आहेत. त्यात आता या प्रकरणात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मोठा खुलासा केला आहे. संतोष देशमुख यांनीा टॉर्चर करून मारलंय, त्याच्या शरीरावर 56 वण सापडले आहेत. डोळ्यावर,पोटावर, पाठीवर, छातीवर असे सगळ्या ठिकाणी हे वण आहेत. तसेच देशमुखांच्या छातीवर गुडघे ठेवून त्यांच्या बरगड्या मोडल्या आहेत, अशी अत्यंत क्रुरपणे संतोष देशमुख यांची हत्या केल्याची माहिती बजरंग सोनवणे यांनी दिली आहे.
बीडमध्ये बजरंग सोनवणे यांची पत्रकार परिषद पार पडली आहे. या पत्रकार परिषदेत बजरंग सोनवणे यांनी संतोष देशमुख यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट वाचून दाखवला आहे. तसेच सोनवणे यांनी यावेळी सगळा घटनाक्रम देखील सांगितला. सरपंचाने फक्त वॉचमनला मदत केली आणि त्याला पोलिस स्टेशनला नेलं होतं. ज्यावेळेस हे दोघेही पोलिस स्टेशनला गेले त्यावेळेस त्यांना तीन ते चार तास बसवून ठेवलं आणि फिर्यादच घेतली नाही. त्यानंतर पोलिसांना एक फोन आला आणि त्यांनी फिर्याद न घेता थातूर माथुर गुन्हा दाखल केला. त्यानंतर सदर आरोपीला अटक दाखवून जामीन दिला गेला. त्यामुळे पीएसआयला आलेला तो फोन कोणाचा होता? हे शोधण्यासाठी निलंबित पीएसआयचं सीडीआर चेक करावं, अशी मागणी बजरंग सोनवणे यांनी केली आहे.
advertisement
देशमुखांच्या हत्येनंतर त्यांच्या भावाला कुणा-कुणाचा फोन आला? पोलीस स्टेशनला बनसोड नावाच्या पीआयला कुणाचा फोन आला? बनसोडला कुणाला फोन आला? महाजन साहेबांना कुणाचा फोन आला? पाटील कुणाच्या संपर्कात होते? तुम्हाला खरा तपास करायचाय ना, तर या तिघांचा सीडीआर काढा,अशी मागणी बजरंग सोनवणे यांनी केली आहे.
तसेच या प्रकरणात खंडणीचा गुन्हा आधी दाखल होतं नाही, नंतर 10 तारखेला दाखल होतो.त्यातही स्वत: एसपींना येऊन गुन्हा दाखल करावा लागतो. त्यामुळे ही कोणाची दहशत आहे? हे सुद्धा पोलिसांनी सांगितले पाहिजे. तसेच या प्रकरणात 4 आरोपींना अटक झालीय, उर्वरित आरोपी कधी पकडणार? 15 दिवस झाले तरी 3 आरोपीचा कां अटक केली जात नाही? असा सवालही बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केला. तसेच या तीनही केसेस सीआयडीकडे तपासणीसाठी वर्ग करावा, असे सोनवणे यांनी म्हटलं आहे.
advertisement
स्व: मुंडे साहेब गृहमंत्री असताना त्यांनी जे केलं होतं ते फडणवीस यांनी करून दाखवावं आणि ही गुन्हेगारी मोडीत काढावी, असे आव्हान सोनवणे यांनी गृहमंत्र्यांना दिलं आहे. तसेच गृहमंत्री यांनी तपास आता कुठपर्यंत पोहोचला याची देखील माहिती द्यावी, अशी मागणी सोनवणे यांनी केली आहे.
view commentsLocation :
Bid,Maharashtra
First Published :
December 25, 2024 11:35 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुखांना टॉर्चर करून मारलं, त्यांच्या शरीरावर 56..., हत्या प्रकरणात पवारांच्या खासदाराने उडवली खळबळ


