पत्रे उडाले, होर्डिंग कोसळलं, साताऱ्यात वादळी पावसाने मोठं नुकसान, दोघे जखमी
- Published by:News18 Marathi
- Reported by:Shubham Sharad Bodake
Last Updated:
साताऱ्यातील कोरेगाव परिसराला वादळी पावसाने जोराचा तडाखा दिला. घरावरील पत्रे, बॅनर, होर्डिंग उडून रस्त्यावर पडली आहेत.
शुभम बोडके, प्रतिनिधी
सातारा: गेले काही दिवस सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोर धरला आहे. कोरेगाव परिसरात शनिवारी वादळी पाऊस झाला. यात घरावरील छत, होर्डिंग, बॅनर उडून गेले आहेत. तसेच विजेच्या खांब आणि तारा पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. कोरेगाव येथील आझाद चौक परिसरातील घरांवरून उडालेल्या छताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
advertisement
वादळी पावसाने मोठे नुकसान
कोरेगाव परिसराला वादळी वाऱ्यासह आलेल्या जोरदार पावसाने झोडपून काढले. अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटलेल्या आहेत. मोठमोठी झाडे उन्मळून कोरेगाव पंढरपूर रस्त्यावर पडली आहेत. त्यामुळे कोरेगाव आणि परिसराचा वीज पुरवठा खंडित झालेला आहे. पावसाचा आणि वाऱ्याचा जोर प्रचंड असल्यामुळे काही वेळातच सर्वत्र पाणी पाणी झाले. अचानक आलेल्या पावसाने आणि सुसाटच्या वाऱ्याने शेतकरी, सर्वसामान्य माणूस, व्यापायांची दैना उडाली होती.
advertisement
जीवितहानी नाही
view commentsअचानक जोरदार वारा सुटला आणि वादळी दृश्यने कोरेगाव परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. कोरेगावातील काहीच्या घराचे छत उडून गेले. उडून गेलेले पत्रे अस्ताव्यस्त रस्त्यावर पडले आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी यामध्ये झाली नाही. मात्र दोन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या उडून गेलेल्या पत्रांमुळे काही ठिकाणच्या विजेचे तारा तुटून विद्युत पुरवठा खंडित झाला. तर रस्त्यावरील ट्राफिक जाम झाले होते.
Location :
Satara,Maharashtra
First Published :
June 09, 2024 10:44 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
पत्रे उडाले, होर्डिंग कोसळलं, साताऱ्यात वादळी पावसाने मोठं नुकसान, दोघे जखमी

