BMC Election: मुंबई महापालिकेबाबत शरद पवार यांची मोठी घोषणा, पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात म्हणाले...
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Sharad Pawar On BMC Election: ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार’ पक्षाचे मुंबई येथील घाटकोपरमध्ये संकल्प शिबीर संपन्न झाले. यावेळी केलेल्या भाषणात शरद पवार यांनी पक्षाची महापालिकेबद्दलची भूमिका स्पष्ट केली.
मुंबई : मुंबई महापालिकांसह अनेक महापालिकांच्या निवडणुका सुमारे आठ वर्षांनंतर पुन्हा होणार आहेत. दिवाळीनंतर निवडणुका होण्याचे संकेत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सगळेच राजकीय पक्ष तयारीला लागले असून मुंबईत काहीसा कमी प्रभाव असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही 'मिशन मुंबई'साठी मैदानात उतरला आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिवेशन आज मुंबईतील घाटकोपर येथे झाले.
‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार’ पक्षाचे मुंबई येथील घाटकोपरमध्ये संकल्प शिबीर संपन्न झाले. यावेळी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीतील विजय, विधानसभेला आलेले अपयश आणि महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने करावयाची तयारी अशा मुद्द्यांवर मार्गदर्शन केले.
लोकसभा-विधानसभा निवडणुकीवर भाष्य
शरद पवार म्हणाले, सगळ्यांनी एकत्रित येऊन संघर्ष करण्याची तयारी दाखवली. लोकसभा निवडणुका झाल्या. महाराष्ट्रात आपल्याला लोकसभेला चांगले यश मिळाले. आपण १० जागा लढलो परंतु २ जागा जिंकू शकलो नाही. आज देशाच्या संसदेत आपले ८ खासदार आहेत. ते एका विचाराने महाराष्ट्राबाबत चांगल्या पद्धतीने विषय मांडतात. लोकसभेला चांगलं यश मिळाले मात्र विधानसभेला तसे चित्र राहिले नाही. निवडणुक यंत्रणेबाबत लोकांच्या मनात संशय आहे. राहुल गांधी यांनी एक लेख लिहिला. विधानसभा निकाल अस्वस्थ करणारा होता. मात्र पक्षाचा सामान्य कार्यकर्ता मजबूत आहे.
advertisement
मुंबई महापालिकेबाबत शरद पवार यांची मोठी घोषणा
पालिका निवडणुकीबाबत आपली रणनीती काय असावी याबाबत चर्चा करताना आम्ही ठरवलं आहे, जिथे निवडणुका आहेत तिथल्या लोकांनी एकत्रित बसून निर्णय घ्यावा. तिथे काय करता येईल हे त्यांनी ठरवायचे आहे. मुंबई पालिकेला आपण सामोरे जात आहोत. आपण स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेत असेल तर त्या निर्णयाच्या पाठीशी पक्ष असेल. किंबहुना तुम्हाला वाटलं की आपण बसून इतर पक्षांशी देखील चर्चा करायला हवी तर त्याबाबत देखील पक्ष पाठीशी असेल, अशी मोठी घोषणा शरद पवार यांनी केली.
advertisement
राखी जाधव यांच्या नेतृत्वात मुंबईत राष्ट्रवादी लढणार
आपल्याला आता महापालिका निवडणुकीला सामोरे जायचे आहे. राखी जाधव यांच्या नेतृत्वात आपण निवडणूक लढणार आहोत. त्या जो निर्णय घेतील त्यांच्या पाठीशी आम्ही राहू, असे शरद पवार म्हणाले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 15, 2025 6:47 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC Election: मुंबई महापालिकेबाबत शरद पवार यांची मोठी घोषणा, पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात म्हणाले...