मग छ.संभाजी महाराज..., शिवसेना आमदार संजय गायकवाडांचं संतापजनक वक्तव्य
- Published by:sachin Salve
Last Updated:
हिंदी प्रेमाच्या नादात आमदार गायकवाड यांनी छत्रपती संभाजी महाराज आणि जिजाऊ माँबद्दल अत्यंत वादग्रस्त असं वक्तव्य केलं
शशिकांत पाटील, प्रतिनिधी
लातूर : आपल्या वेगवेगवेळ्या विधानांमुळे कायम चर्चेत राहणारे शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी आता तर अक्कलेचे तारे तोडण्याचा प्रताप केला आहे. हिंदी प्रेमाच्या नादात आमदार गायकवाड यांनी छत्रपती संभाजी महाराज आणि जिजाऊ माँबद्दल अत्यंत वादग्रस्त असं वक्तव्य केलं आहे. गायकवाड यांनी संभाजीराजेंना ते काय मुर्ख होते का? असं संतापजनक वक्तव्य केलं आहे.
advertisement
लातूर जिल्ह्यातील हडोळती इथं जाऊन आमदार संजय गायकवाड यांनी शेतकऱ्यांना बैलजोडी आणि गृहउपयोगी साहित्याची मदत केली. पण, यावेळी पत्रकारांशी बोलत असताना आमदार संजय गायकवाड यांनी हिंदी विषयी प्रेम दाखविण्याच्या नादात वादग्रस्त विधान केलं आहे.
शिवसेना आमदार गायकवाड यांचं छत्रपती संभाजी महाराज आणि जिजाऊ माँबद्दल संतापजनक वक्तव्य pic.twitter.com/U0hUGzfGTc
— News18Lokmat (@News18lokmat) July 5, 2025
advertisement
आज हिंदीचं काय, जगामध्ये टिकायचं असेल तर सगळ्या भाषा अवगत असल्या पाहिजे. छत्रपती संभाजी महाराज १६ भाषा शिकले मग ते काय मुर्ख होते का? शिवाजी महाराज, ताराराणी, येसूबाई, जिजाऊ माँ या अनेक भाषा शिकल्या, हिंदीसह अनेक भाषा शिकल्यात. ते बहुभाषिक होते. मग ते लोक काय मुर्ख होते का? असं संजय गायकवाड म्हणाले.
advertisement
उर्दू सुद्धा आली पाहिजे - गायकवाड
गायकवाड एवढ्यावरच थांबले नाही, उगाच वाद करून मतांचं गणित करणं, राजकारण करणे चुकीचं आहे. जर पाकिस्तानाच दहशतवाद नष्ट करायचा असेल तर आपल्या उर्दू सुधा आली पाहिजे. त्याामुळे पाकिस्तानाच्या अतिरेक्यांचे मनसुबे सुद्धा उधळू शकत नाही, असा जावई शोधच गायकवाड यांनी यावेळी लावला.
'ठाकरे ब्रँड असता तर बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना २८८ आमदार असते'
१५ वर्षांपूर्वी जर एकत्र आले असते तर काही तरी परिणाम जाणवला असता. पण बाळासाहेबांचं विचार सोडून उद्धव ठाकरे गेले, त्यामुळे हिंदुत्व शिल्लक राहिलं नाही. मुळात राज ठाकरेंनी टाळी देण्यासाठी फार उशीर केला त्यामुळे फार फार तर केसाचा फरक जाणवेल. आता तुम्ही किती लोकांची काम करतात यावर सगळं ठरतंय, जर ठाकरे नावाचा ब्रँड असता तर बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना २८८ आमदार जिंकून आले असते. तेव्हा सुद्धा ७०, ७४ जागांच्या पुढे गेलो नाही, असंही गायकवाड म्हणाले.
Location :
Latur,Maharashtra
First Published :
July 05, 2025 6:35 PM IST