Nashik Shiv Sena UBT : संजय राऊतांनी पाठ फिरवताच नाशिकमध्ये नाराजी उफाळली, बडा नेता भाजपच्या वाटेवर
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Nashik Shiv Sena UBT BJP : येत्या 8 दिवसात शिवसेना ठाकरे गट नाहीसा होणार असल्याचे भाकीत भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी केले होते. त्यानंतर आता हे भाकीत खरं होण्याची चिन्ह दिसू लागली आहे.
लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी, नाशिक: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या आधी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची चिन्ह आहेत. सोमवारी, स्थानिक समस्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर आज ठाकरेंच्या शिलेदाराने आपल्या मनातील खदखद अखेर बाहेर काढली आहे. येत्या 8 दिवसात शिवसेना ठाकरे गट नाहीसा होणार असल्याचे भाकीत भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी केले होते. त्यानंतर आता हे भाकीत खरं होण्याची चिन्ह दिसू लागली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते आणि नाशिक शहरमधील महत्त्वाचा चेहरा असलेले सुधाकर बडगुजर हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू आहेत. सुधाकर बडगुजर यांनी सोमवारी, नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. आपण शहरातील समस्यांबाबत फडणवीसांना भेटलो असल्याचे त्यांनी सांगितले. या अनपेक्षित भेटीमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाल्यानंतर बडगुजर यांच्या पक्षांतराच्या चर्चांना उधाण आले होते. आता या चर्चा खऱ्या होताना दिसत आहे.
advertisement
होय, मी नाराज... बडगुजरांचे मनातलं ओठांवर आलं....
आज माध्यमांशी बोलताना बडगुजर यांनी मनातील खदखद व्यक्त केली. बडगुजर यांनी म्हटले की, "हो, मी पक्षात नाराज आहे. पण मीच नाही, तर आमच्यासारखे 10 ते 12 जण सध्या नाराजी व्यक्त करत आहेत." त्यांनी ही नाराजी वैयक्तिक नसून, पक्ष संघटनेत झालेल्या बदलांबाबत असल्याचे सांगितले. पक्ष संघटनेत जेव्हा बदल झाले, तेव्हा आम्हाला विश्वासात घेतले गेले नाही. त्यामुळेच ही नाराजी आहे," असल्याचे त्यांनी सांगितले.
advertisement
संजय राऊतांवर रोख?
संजय राऊत यांच्यावरील नाराजीच्या चर्चांना त्यांनी साफ नकार दिला. "संजय राऊत आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्याविरोधात कोणतीही नाराजी नाही. आमची नाराजी ही कार्यपद्धती आणि संघटनात्मक बदलांबाबत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि मला न्याय मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, आमचा अपेक्षाभंग झाल्याचे त्यांनी म्हटले.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
June 03, 2025 12:25 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nashik Shiv Sena UBT : संजय राऊतांनी पाठ फिरवताच नाशिकमध्ये नाराजी उफाळली, बडा नेता भाजपच्या वाटेवर