Sina River Flood: सीनेनं पुन्हा दाखवलं रौद्ररुप! सोलापूर-विजापूर महामार्ग पाण्याखाली, वाहतूक ठप्प
- Published by:Vrushali Kedar
Last Updated:
Sina River Flood: सीना कोळेगाव धरणातून सध्या 1 लाख 45 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
सोलापूर: गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा आणि पुराचा सामना करणाऱ्या सोलापूर जिल्ह्याच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसत आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या सीना नदीची पाणी पातळी पुन्हा वाढली आहे. सीना कोळेगाव धरणातून सध्या 1 लाख 45 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सोलापूर ते विजापूर हा राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. पुलावर पाणी आल्याने आज (सोमवार) पहाटे 5 वाजून 30 मिनिटांपासून या मार्गावर वाहतूक बंद करण्यात आली.
सीना नदीचा उगम अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे. अहिल्यानगरमध्ये शनिवारी आणि रविवारी मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे सीनेच्या पाणी पातळीत वाढ झाली आणि नदीला पुन्हा एकदा पूर आला. अहिल्यानगरमधून वाहणारी सीन नदी पुढे सोलापूर जिल्ह्यातून वाहते. नदीला आलेल्या पुरामुळे सोलापूरमध्ये सर्वाधिक नुकसान झालं आहे. जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. सोलापूर-विजापूर महामार्ग पाण्याखाली गेला असून वाहतूक बंद करण्यात आली आहे. महामार्ग अचानक बंद झाल्याने वाहनधारकांची तारांबळ उडाली असून वाहनांच्या लांबच-लांब रांगा पाहायला मिळत आहेत.
advertisement
मराठवाडा आणि सोलापुरात सुरू असलेल्या पावसामुळे 24 सप्टेंबर रोजी देखील नदीला महापूर आला होता. तेव्हा देखील सोलापूर-विजापूरला जोडणारा महामार्ग पाण्याखाली गेल्याने या महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर तब्बल 48 तासानंतर या महामार्गावरून वाहतूक सुरू करण्यात आली होती.
view commentsLocation :
Solapur,Maharashtra
First Published :
Sep 29, 2025 9:59 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sina River Flood: सीनेनं पुन्हा दाखवलं रौद्ररुप! सोलापूर-विजापूर महामार्ग पाण्याखाली, वाहतूक ठप्प








