दोन महिन्यांपूर्वी प्रेमविवाह, चार्जरच्या वायरने गळा आवळून बायकोला मारलं, स्वतःनेही घेतला गळफास

Last Updated:

Solapur News: उळेगावात राहणाऱ्या गोपाळ लक्ष्मण गुंड (वय-३०) आणि गायत्री गोपाळ गुंड (वय-२२) अशी दोघा पती-पत्नींची नावे आहेत.

नवरा बायकोचा मृत्यू
नवरा बायकोचा मृत्यू
प्रीतम पंडित, सोलापूर : दोन महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या दाम्पत्याने टोकाचे पाऊल उचलले. चार्जरच्या वायरने गळा आवळून नवऱ्याने बायकोचा खून केला तर घटनेनंतर नवऱ्यानेही गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे गावात ही धक्कादायक घटना घडली आहे.
उळेगावात राहणाऱ्या गोपाळ लक्ष्मण गुंड (वय-३०) आणि गायत्री गोपाळ गुंड (वय-२२) अशी दोघा पती-पत्नींची नावे आहेत. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून घटनास्थळाचा पंचनामाही केला आहे. दोनच महिन्यांपूर्वी प्रेम विवाह झालेल्या जोडप्याने असे पाऊल उचलल्याने मुलीच्या कुटुंबियांचा मुलावर दबाव होता का? याची चौकशी पोलीस करत आहे. घडलेल्या घटनेने संपूर्ण सोलापुरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
advertisement

दोन महिन्यांपूर्वी मुलाचे लग्न, मुलीच्या घरच्यांनी... प्रसंग सांगताना मृत मुलाचे वडील हुंदक्यांनी दाटले

माझ्या मुलाचा आळंदी संस्थेत प्रेमविवाह केला होता. सव्वा दोन महिन्यांपू्र्वी त्यांचे लग्न झाले होते. त्यांच्यात नेमके काय झाले, मला माहिती नाही. त्यांचे व्यवस्थित जमत होते. आषाढी एकादशीला आम्ही कीर्तनाला गेलो होतो. तिकडून आम्ही घरी परत आलो तेव्हा ते मृतावस्थेत पडले होते. गावात आम्ही फोन केले. नंतर पोलिसांना कळवले.
advertisement
आठ वाजता आम्ही कीर्तनला गेलो होतो. फराळ करून घ्या, असे आम्ही त्यांना सांगून निघालो. त्यावर तुम्ही फराळ कधी करणार? असे दोघांनाही आम्हाला विचारले. त्यावर कीर्तनाहून आल्यावर फराळ करतो. तोपर्यंत तुम्ही थांबू नका, खाऊन घ्या , असे आम्ही त्यांना सांगितल्याचे मुलाच्या वडिलांनी सांगितले.
मुलाचे शिक्षण आठवीपर्यंत झाले होते. माझ्या मुलाचा दुधाचा व्यवसाय होता. मुलीच्या घरी तो दूध घालायला जायचा. त्याचवेळी त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाल्याचा संशय वडिलांनी व्यक्त केला. लग्नादरम्यान पोलीस तक्रार वगैरे झाली होती. मी तुला लहानाची मोठी केली, शिक्षण दिले, तुझे संगोपन केले पण तू माझा विश्वासघात केला, असा संताप मुलीच्या वडिलांनी लग्नानंतर व्यक्त केला होता, असेही मृत मुलाच्या वडिलांनी सांगितले. तसेच दोन महिन्यांनंतर तुमचे काय होतेय ते बघा... अशी धमकी मुलीच्या वडिलांनी त्यावेळी दिल्याचेही मुलाच्या वडिलांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दोन महिन्यांपूर्वी प्रेमविवाह, चार्जरच्या वायरने गळा आवळून बायकोला मारलं, स्वतःनेही घेतला गळफास
Next Article
advertisement
Dhurandharची Real स्टोरी, SSP चौधरी असलम कोण होता? 9 वेळा मृत्यूला चकवा दिला; पाहा कधीही न पाहिलेले फोटो
Dhurandharची Real स्टोरी, SSP चौधरी असलम कोण होता? 9 वेळा मृत्यूला चकवा दिला
  • ज्याच्यावरून धुरंधर साकारला गेला तो चौधरी असलम कोण होता?

  • सिगारेट, पिस्तूल आणि ‘हवा-हवा’ – धुरंधरमागची खरी कहाणी थरकाप उडवणारी

  • एक माणूस, एक शहर आणि अखेरचा स्फोट – धुरंधरमागची खरी स्टोरी

View All
advertisement