...तर मी राजीनामा देतो, शपथ घेण्याआधीच शरद पवारांच्या आमदाराचा आक्रमक पवित्रा

Last Updated:

शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी बॅलेट पेपरवर मतदान घेणार असाल तर मी राजीनामा देण्यास तयार असल्याचं म्हटलंय.

News18
News18
सोलापूर : विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम निकालावर संशय व्यक्त करत मारकडवाडी इथल्या गावकऱ्यांना बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी केली होती. मात्र गावकऱ्यांना बॅलेट पेपरवर मतदान घेण्यापासून रोखण्यात आलं. सरकारने दडपशाही केल्याचा आरोप करत विरोधकांनी आमदारकीची शपथ घेण्यास नकार दिला. यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार हे मारकडवाडीत पोहोचले आहेत. यावेळी शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी बॅलेट पेपरवर मतदान घेणार असाल तर मी राजीनामा देण्यास तयार असल्याचं म्हटलंय.
मारकडवाडीतील १४०० लोकांनी अॅफेडीवेट करून ८१ ग्रामपंचायतींचे ठराव करून बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे अशी मागणी आम्ही करणार आहे. जर बॅलेट पेपरवर मतदान घेणार असतील तर मी राजीनामा देण्यास तयार आहे. बॅलेट पेपरवर मतदान घेणार असाल तर मी राजीनामा देतो असं उत्तम जानकर यांनी म्हटलं. याआधीच्या निवडणुकांमध्ये उत्तम जानकर यांना मारकडवाडीत ८० टक्के मतदान मिळालं होतं. पण यावेळी त्यांना गावात खूपच कमी मतदान मिळाल्यानं गावकऱ्यांनी यावर आक्षेप घेत ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर मतदानाची मागणी केली होती.
advertisement
लोकशाही वाचवायची असेल तर ती फक्त शरद पवारच वाचवू शकतात. मी राजीनामा देऊ का? राजीनामा देऊन बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याच्या अटीवर मी राजीनामा देणार आहे.⁠राहुल गांधींच्यावतीने त्यांचे प्रतिनिधी मारकडवाडीत येऊन गेले. ⁠अनेक निवृत्त न्यायाधीश येथे येणार आहेत.⁠सामाजिक कार्यकर्ते येणार आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर देशात अनागोंदी येईल असंही जानकर यांनी म्हटलं.
advertisement
⁠गुरुवारच्या माळशिरसच्या बाजारात मोदींना आणलं होतं, लोकसभेच्या निवडणुकीत. तरीही भाजपच्या उमेदवाराला ६४ हजार मतदान झाले होते. आणि विधानसभेला १लाख ८ हजार कसे झाले असा सवाल उत्तम जानकर यांनी विचारला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
...तर मी राजीनामा देतो, शपथ घेण्याआधीच शरद पवारांच्या आमदाराचा आक्रमक पवित्रा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement