Solapur Crime : फौजदार जावई पाहिजे! खोटा बायोडाटा टाकून मुलींना फसवणाऱ्या तरुणाला अटक, पोरगी बघायला जायचा अन्...
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Solapur Crime News : वैभवने मुलींची फसवणूक केली. तसेच, विवाहइच्छुक मुलींशी ओळख वाढवून, त्यांना वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून पैसे उकळले.
Solapur Crime News : मुंबई येथे फौजदार असल्याच्या थापा मारून लग्नाचे आमिष दाखवत मुलींना फसवणाऱ्या एका भामट्याला सोलापूर सायबर पोलिसांनी (Cyber Police) अटक केली आहे. मॅटरीमॉनियल ॲपवर खोटा बायोडाटा टाकून या तरुणाने अनेक तरुणींना फसवल्याचे उघड झालं आहे. वैभव दीपक नारकर असे 31 वर्षीय तरुणाचे नाव असून, त्याने आतापर्यंत 8 तरुणींची फसवणूक केल्याचे पोलीस तपासात (Police Investigation) समोर आले आहे.
पोलीस वर्दीतील खोटे फोटो
वैभव याने लग्न जुळवणाऱ्या एका ॲपवर स्वतःला पोलीस उपनिरीक्षक असल्याचे सांगितलं होतं. बनावट बायोडाटा आणि पोलीस वर्दीतील खोटे फोटो वापरून त्याने मुलींची फसवणूक केली. तसेच, विवाहइच्छुक मुलींशी ओळख वाढवून, त्यांना वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून पैसे उकळले.
मंत्रालयात नोकरीला असल्याचे सांगून...
याशिवाय, आपण मंत्रालयात नोकरीला असल्याचे सांगून 40 ते 50 जणांना नोकरीचे आमिष दाखवत फसवल्याचे देखील चौकशीत उघड झाले आहे. या प्रकरणी आर्थिक फसवणूक (Financial Fraud) झालेल्या एका मुलीने सोलापूर सायबर पोलिसांत (Solapur Cyber Police) तक्रार दाखल केली होती. तांत्रिक गोष्टींचे विश्लेष केल्यानंतर पोलिसांनी आरोपी वैभव नारकर याला मुंबईतून अटक केली आहे.
advertisement
सोलापुरात नात्याचा रक्तरंजि शेवट
दरम्यान, दुसरीकडे गुन्हेगारीच्या घटना देखील सोलापुरात वाढत आहेत. न्यू बुधवार पेठेत राहणाऱ्या पतीने आपल्या पत्नीचा निर्घृणपणे खून केला आणि त्यानंतर स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर होऊन आत्मसमर्पण देखील केलं. प्रेम आणि संशयाच्या नाजूक धाग्याने बांधलेल्या नात्याचा रक्तरंजि शेवट झाल्याचं पहायला मिळतंय.
view commentsLocation :
Solapur,Maharashtra
First Published :
October 15, 2025 11:23 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Solapur Crime : फौजदार जावई पाहिजे! खोटा बायोडाटा टाकून मुलींना फसवणाऱ्या तरुणाला अटक, पोरगी बघायला जायचा अन्...