Solapur News : प्रेमात अडसर ठरणाऱ्या चिमुकल्याचा आईने प्रियकरासोबत घोटला गळा, सोलापूर हादरलं
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Solapur News : या घटनेत आईने प्रियकरासोबत पोटच्या चार वर्षीय मुलाचा गळा दाबून खून केला.
जितेंद्र जाधव, प्रतिनिधी
सोलापूर, 28 ऑगस्ट : राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं दिसत आहे. अशातच आता सोलापूर जिल्ह्यातून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. या घटनेत आईनेच पोटच्या चार वर्षीय मुलीचा गळा दाबून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रेमात अडसर ठरत असल्याने आईने तिच्या प्रियकरासोबत हे धक्कादायक कृत्य केलं आहे. माढा तालुक्यातील मोडलिंब येथे ही घटना घडली आहे.
advertisement
प्रेमात अडसर होत असल्याने पोटच्या मुलाचा घोटळा गळा
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील मोडलिंब येथे राहणाऱ्या आई आणि तिच्या प्रियकराने प्रेमात अडथळा ठरणाऱ्या चार वर्षाच्या चुटक्या नावाच्या मुलाचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह पुरंदर तालुक्यातील माळशिरस जवळील भुलेश्वर घाटात फेकून दिला. आई रेणू शंकर पवार व तिचा प्रियकर उमेश अरुण साळुंके अशी आरोपींचे नावे आहेत.
advertisement
या प्रकरणी जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मोडलिंब येथे राहणारे रेणू पवार आणि उमेश साळुंके यांच्यात प्रेम संबंध होते. या प्रेम संबंधात अडथळा ठरणाऱ्या चार वर्षाच्या चुटक्या या मुलाचा दोघांनी दीड महिन्यांपूर्वी गळा दाबून खून केला. खून केल्यानंतर त्याचा मृतदेह साडीत गुंडाळून व पुरावा नष्ट करण्यासाठी दुचाकी गाडीवर घेवून येवून ते पुरंदर तालुक्यातील भुलेश्वर घाटात फेकून दिला.
advertisement
या बाबत रेणू पवार हिच्या चुलत बहिणीने पोलीस स्टेशन ला फिर्याद दिली. त्यानुसार जेजुरी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेवून घाटात फेकून दिलेल्या चिमुकल्यांच्या मृतहेदाचे अवशेष शोधून काढले आहेत. दोघांवर जेजुरी पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मनोज नवसरे तपास करीत आहेत.
view commentsLocation :
Solapur,Solapur,Maharashtra
First Published :
August 28, 2023 9:38 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Solapur News : प्रेमात अडसर ठरणाऱ्या चिमुकल्याचा आईने प्रियकरासोबत घोटला गळा, सोलापूर हादरलं


