Shiv Sena UBT : 'तर, तो गुन्हा मान्य..' ठाकरे गटाच्या नेत्यानं हकालपट्टी झाल्यानंतर मनातलं सगळं सांगितलं
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Nashik News : नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषद सुरू असताना बडगुजर यांच्या हकालपट्टीची माहिती फोनवरून देण्यात आली. त्यानंतर पत्रकार परिषदेत याची माहिती देण्यात आली. पक्षाच्या या निर्णयानंतर बडगुजर यांनी आपल्या मनातली खदखद बाहेर काढली.
नाशिक: नाशिकमध्ये मोठी राजकीय घडामोड झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषद सुरू असताना बडगुजर यांच्या हकालपट्टीची माहिती फोनवरून देण्यात आली. त्यानंतर पत्रकार परिषदेत याची माहिती देण्यात आली. पक्षाच्या या निर्णयानंतर बडगुजर यांनी आपल्या मनातली खदखद बाहेर काढली.
ठाकरे गटाचे नाशिकचे जिल्हाप्रमुख डी.जी. सूर्यवंशी यांनी आज पत्रकार परिषद बोलावली. या पत्रकार परिषदेला महानगरप्रमुख विलास शिंदे, खासदार राजाभाऊ वाजे, उपनेते सुनील बागुल, उपनेते दत्ता गायकवाड, माजी महापौर विनायक पांडे, माजी आमदार वसंत गीते आदी उपस्थित होते. मात्र, बडगुजर यांनी पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याचे सांगत पत्रकार परिषदेला येणे टाळले होते. त्यानंतर याच पत्रकार परिषदेत शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्थानिक पदाधिकार्यांना फोन करून बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती दिली.
advertisement
पक्षातून हकालपट्टी, बडगुजरांनी काय म्हटले?
सुधाकर बडगुजर यांनी पक्षात उघडपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर पक्षाकडून त्यांची हकालपट्टी करण्यात आली. मात्र, या कारवाईवर त्यांनी प्रतिक्रिया देत, "नाराजी व्यक्त करणे हा गुन्हा असेल तर मी तो गुन्हा केलाय आणि त्याची शिक्षा जर हकालपट्टी आहे, तर ही शिक्षादेखील मान्य असल्याचे बडगुजर यांनी सांगितले.
त्यांनी म्हटले की, काही महिन्यापूर्वी पक्षांतर्गत नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. या नियुक्तीवरून पक्षातील 12-15 जणांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या मनातील ही नाराजी उघडपणे मांडली असल्याचे बडगुजर यांनी म्हटले. शिवसेना ही फक्त संजय राऊत यांची नाही, तशी ती बडगुजर यांची देखील नसल्याचे त्यांनी म्हटले.
advertisement
कोणत्या पक्षात जाणार?
शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते आणि नाशिक शहरमधील महत्त्वाचा चेहरा असलेले सुधाकर बडगुजर हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू आहेत. सुधाकर बडगुजर यांनी सोमवारी, नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. आपण शहरातील समस्यांबाबत फडणवीसांना भेटलो असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर मंगळवारी त्यांनी आपण पक्षात नाराज आहोत, असे म्हटले. यावरून ते भाजपात जाणार असल्याचे म्हटले जात आहे.
advertisement
आगामी राजकीय वाटचालीबाबत बोलताना बडगुजर यांनी म्हटले की, आपण सध्या एका कौटुंबिक कार्यक्रमात आहोत. अजून काही ठरवलं नसून तूर्तास 'वेट अॅण्ड वॉच'च्या भूमिकेत असल्याचे त्यांनी म्हटले.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
June 04, 2025 1:14 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Shiv Sena UBT : 'तर, तो गुन्हा मान्य..' ठाकरे गटाच्या नेत्यानं हकालपट्टी झाल्यानंतर मनातलं सगळं सांगितलं