Thane: लग्नाला आठ महिनेच झाले होते, दुचाकीवरून घरी जाताना कंटेनरच्या धडकेत आरतीचा मृत्यू

Last Updated:

Thane Ghodbandar Road Accident: कंटनेरच्या धडकेत दुचाकीवरील आरतीचा जागीच मृत्यू झाला. तिचे आठ महिन्यांपूर्वी लग्न झाले होते.

ठाणे अपघात
ठाणे अपघात
अजित मांढरे, प्रतिनिधी, ठाणे : ठाण्यातील घोडबंदर मार्गावर झालेल्या एका भीषण अपघाताने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. रात्रीच्या सुमारास वाघबीळ उड्डाणपुलाजवळून घोडबंदर मार्गावर प्रवास करत असताना पाठीमागून आलेल्या कंटेनरने दिलेल्या जोरदार धडकेत २७ वर्षीय आरती सुशील अग्रवाल यांचा जागीच मृत्यू झाला.
सदर कंटेनर चालकाला कासारवडवली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या अपघाताची शोकांतिका इतकी हृदय पिळवटून टाकणारी आहे की, आरतीचे नुकतेच १९ जानेवारी २०२५ रोजी लग्न झाले होते. संसाराची नवी स्वप्नं, नवी आशा डोळ्यांत घेऊन घरात आलेली ही नववधू काही महिन्यांतच अशा भीषण अपघाताची बळी ठरेल, याची कुणालाच कल्पना नव्हती.
घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडीने पहिलेच नागरिक त्रस्त आहेत. त्यातच हेवी वाहनांची बेफाम दणदणाटी वाहतूक आणि त्यांच्या निष्काळजीपणामुळे अनेकांना दररोज त्रास सहन करावा लागतो. अशाच निष्काळजीपणामुळे या तरुणीचा अमूल्य जीव गेला असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
advertisement
एका निष्पाप तरुणीचे आयुष्य कंटेनरच्या निष्काळजी धडकेत उद्ध्वस्त झाले. नव्या आयुष्याची सुरुवात करणाऱ्या मुलीला काही महिन्यांतच मृत्यूच्या कवेत ओढल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आरतीच्या घरात अजूनही लग्नाच्या आठवणींनी भरलेला माहोल आहे, मात्र आता त्या आठवणींवर वेदनेचा पडदा पडला आहे. वैवाहिक जीवनाचा आनंदही उभयतांनी साजरा केला नव्हता.

ठाणेकरांकरता आनंद नगर मुलुंड टोल नाका ते गायमुख घाट हा रोड ठरतोय जीवघेणा

advertisement
-या रोडवर गेल्या ६ महिन्यांत १७ जणांचा बळी
-⁠गेल्या ६ महिन्यांत या रोडवर झाले ५७ अपघात
-⁠१७ अपघातात १७ जणांचा मृत्यू
-⁠२५ अपघातात ३३ जण गंभीर जख्मी
-⁠१० किरकोळ अपघातात २२ जण किरकोळ जख्मी
-⁠तर ५ अपघात सामान्य झाले होते ज्यात कोणीही जखमी नाही.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Thane: लग्नाला आठ महिनेच झाले होते, दुचाकीवरून घरी जाताना कंटेनरच्या धडकेत आरतीचा मृत्यू
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement