Dombivali News : डोंबिवलीकर अंधारात! 70 टक्के भागातील बत्ती गुल, महावितरणची पळापळ
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Power Cut In Dombivali : पहाटे 6 वाजल्यापासून बत्ती गुल झाली असून, अनेक सोसायट्यांमध्ये वीज पुरवठा सुरळीत झाला नसल्याची माहिती समोर आली आहे.
अजित मांढरे, प्रतिनिधी, ठाणे: शहरातील तब्बल 70 टक्के भागात पहाटेपासून वीजपुरवठा खंडित झाला असल्याची माहिती समोर आली आहे. विजे अभावी नागरिकांचे हाल सुरू आहेत. पहाटे 6 वाजल्यापासून बत्ती गुल झाली असून, अनेक सोसायट्यांमध्ये वीज पुरवठा सुरळीत झाला नसल्याची माहिती समोर आली आहे. महावितरणकडून सकाळपासून वीज पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जवळपास 6 तासानंतर जवळपास सगळ्याच ठिकाणी वीज पुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आहे.
नागरिकांची प्रचंड गैरसोय, नोकरदारांचे हाल....
अचानकपणे वीज पुरवठा खंडीत झाला. मागील काही तासांपासून वीज पुरवठा सुरळीत न झाल्याने सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची प्रचंड गैरसोय झाली आहे. मोबाईल चार्जिंगपासून लिफ्ट, पाण्याचा पुरवठा, इंटरनेट सेवा अशा अनेक अत्यावश्यक सुविधा ठप्प झाल्या आहेत.
यात आणखी चिंतेची बाब म्हणजे, अत्यावश्यक सेवांसाठी वापरल्या जाणाऱ्या जनरेटरची व्यवस्था देखील संपत आली आहे. त्यामुळे हॉस्पिटल, क्लिनिक, आणि इतर सेवांवरही परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
advertisement
बत्ती गुलचे कारण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सीटी (करंट ट्रान्सफार्मर) मध्ये झालेल्या स्फोटामुळे ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी धावले आहेत. युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम करण्यात आले. मात्र करंटचा लोड योग्य प्रकारे घेतला जात नसल्यामुळे वीज पुर्ववत करण्यात यश मिळत नव्हते.
दरम्यान, वीज पुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांनी सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केला. महावितरणच्या ढिसाळ व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विजेच्या प्रतीक्षेत डोंबिवलीकरांना अंधारात दिवसाची सुरुवात करावी लागली. तर, दुसरीकडे वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू होते. अखेर जवळपास 6 तासानंतर वीज पुरवठा सुरळीत झाल्याची माहिती देण्यात आली.
view commentsLocation :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
June 27, 2025 11:43 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
Dombivali News : डोंबिवलीकर अंधारात! 70 टक्के भागातील बत्ती गुल, महावितरणची पळापळ


