Kalyan-Dombivli News: कल्याण-डोंबिवलीकर पाणी जपून वापरा, ऐन पावसाळ्यात पुरवठा बंद राहणार, कारण काय?
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Kalyan-Dombivli News: कल्याण – डोंबिवलीकरांना ऐन पावसाळ्यात जलसंकटाचा सामना करावा लागेल. मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
कल्याण: राज्यात धो धो पाऊस सुरू असतानाच कल्याण-डोंबिवलीकरांना पाणी जपून वापरावं लागणार आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मोहिली जलशुद्धीकरण केंद्र येथील महावितरण कंपनीच्या मीटर युनिट जोडणे आणि जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत व यांत्रिकी उपकरणांची देखभाल दुरुस्ती काम करण्यात येणार आहे. त्यामुळे मंगळवारी, 29 जुलै रोजी शहरातील काही भआगात सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
या भागात पाणीपुरवठा बंद
कल्याण – डोंबिवली महापालिकेच्या मोहिली जलशुद्धीकरण केंद्रातून महापालिका क्षेत्रातील कल्याण ग्रामीण विभागातील मांडा-टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी व कल्याण ग्रामीण विभागातील इतर गावे, तर कल्याण (पश्चिम) ‘ब’ प्रभागातील मिलिंद नगर, योगिधाम, चिकनघर, बिर्ला कॉलेज, मुरबाड रोड परिसरात पाणी पुरवठा केला जातो. मंगळवारी या भागातील पाणीपुरवठा बंद राहील.
advertisement
पाणी जपून वापरा
view commentsकल्याण – डोंबिवलीत मंगळवारी 8 तासांसाठी पाणीपुरवठा खंडित राहणार आहे. त्यामुळे पुढील 2 दिवस पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.
Location :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
July 27, 2025 9:58 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
Kalyan-Dombivli News: कल्याण-डोंबिवलीकर पाणी जपून वापरा, ऐन पावसाळ्यात पुरवठा बंद राहणार, कारण काय?


