Water Supply: कल्याण-डोंबिवलीत पाणीबाणी! 1 जुलैला ‘या’ भागात पुरवठा बंद, कारण काय?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
Water Supply: ऐन पावसाळ्यात कल्याण – डोंबिवलीकरांना पाणी जपून वापरावं लागणार आहे. 1 जुलैला काही भागाचा पाणीपुरवठा बंद राहील.
डोंबिवली: गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह कल्याण-डोंबिवली परिसरात पावसाचा जोर कायम आहे. तरीही कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना पाणी जपून वापरावं लागणार आहे. शहरातील अनेक भागांमध्ये मंगळवार, 1 जुलै रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 4 या वेळेत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.
टाटा पॉवर कांबा सबस्टेशनमधील एनआरसी 2 फिडरचे नियोजित देखभाल आणि दुरुस्तीचे काम मंगळवारी करण्यात येणार आहे. या फिडरवर अवलंबून असलेली कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या 150 द.ल.ली. मोहिली उदंचन केंद्र तसेच 100 द.ल.ली. मोहिली जलशुद्धीकरण केंद्र येथील वीजपुरवठा खंडित होणार आहे. त्यामुळे ते पूर्ण क्षमतेने काम करू शकणार नाहीत. परिणामी, कल्याण व डोंबिवली परिसरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा खंडित होणार आहे.
advertisement
या भागात पाणीपुरवठा बंद
महापालिकेच्या माहितीनुसार, मुख्यत: कल्याण पूर्व-पश्चिम, डोंबिवली पूर्व-पश्चिम, मिलिंदनगर, योगीधाम, चिकनघर, बिर्ला महाविद्यालय परिसर, म्हाडा वसाहत, मुरबाड रोड परिसर यांसारख्या शहरी भागांतील पाणी खंडित राहणार आहे. तसेच मांडा, टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी, मोहने आदी ग्रामीण भागांतही याचा परिणाम होणार आहे.
advertisement
महापालिकेने नागरिकांना 30 जून रोजीच पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन केले आहे. पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची विनंती करण्यात आली आहे. पाणी पुरवठा तात्पुरत्या काळासाठी बंद असून पावसाळ्यापूर्वी आवश्यक असलेली देखभाल पूर्ण करण्यासाठीच हे पाऊल उचलण्यात आले आहे. नागरिकांनी संयम बाळगावा व सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केलं आहे.
view commentsLocation :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
June 28, 2025 10:23 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
Water Supply: कल्याण-डोंबिवलीत पाणीबाणी! 1 जुलैला ‘या’ भागात पुरवठा बंद, कारण काय?


