Thane Crime : RTOचा मेसेज पडला महागात! व्हॉट्सअ‍ॅपवरील एका क्लिकने व्यक्तीला 3.2 लाखांना गंडा, नेमकं झालं काय?

Last Updated:

Thane Cyber Fraud News : भिवंडीतील एका व्यक्तीला व्हॉट्सअ‍ॅपवर आलेल्या बनावट आरटीओ चलनाच्या फाइलमुळे तब्बल 3.2 लाखांचा फटका बसला. नेमके काय घडले ते सविस्तर जाणून घेऊयात.

Thane Cirme News
Thane Cirme News
ठाणे : गेल्या काही दिवसांत सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे चित्र समोर येत आहे. ऑनलाईन व्यवहार, मोबाईल बँकिंग, सोशल मीडिया आणि डिजिटल पेमेंट अ‍ॅप्सच्या वाढत्या वापरामुळे फसवणूक करणाऱ्यांसाठी नवीन मार्ग खुले झाले आहेत. नागरिकांचा थोडासा निष्काळजीपणा अनेकदा मोठ्या आर्थिक तोट्याचे कारण ठरतो. असाच एक फटका भिंवडीतील व्यक्तीला बसला आहे.
जाणून घ्या नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार भिवंडीतील एका व्यक्ती सोबत घडलेला आहे. ज्यात त्याला तब्बल 3.2 लाखांचा फटका बसला.  पीडित व्यक्तीला एका अनोळखी नंबरवरून RTO Challan नावाची फाइल आली होती. त्यानंतर आरटीओकडून चालान आल्याचा गैरसमज झाल्याने त्याने ती फाइल आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड केली. मात्र, ही फाइल डाउनलोड होताच फसवणूक करणाऱ्यांना त्याच्या मोबाईलवर पूर्णपणे रिमोट अ‍ॅक्सेस मिळाला. त्यानंतर त्यांनी त्याच्या आणि त्याच्या पत्नीच्या नावावर असलेल्या विविध बँक खात्यांमधून पैसे ट्रान्सफर करून फसवणूक केली.
advertisement
काही वेळानंतर बँक व्यवहारांचे अलर्ट मॅसेज येऊ लागल्याने पीडित व्यक्तीला संशय आला. लगेच त्याने आपले बँक खाते तपासले असता त्यातल्या मोठ्या रकमांचे व्यवहार झाल्याचे लक्षात आले. या प्रकारानंतर त्याने लगेच जवळच्या पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणूक करणाऱ्यांनी वापरलेली एपीके फाइल ही अत्यंत घातक प्रकारातील असून ती इन्स्टॉल होताच मोबाईलवरील सर्व माहिती जसे की बँक अ‍ॅप्स, ओटीपी, पासवर्ड आणि इतर संवेदनशील डेटा त्यांच्यापर्यंत पोहोचवते. सायबर गुन्हेगारांनी या डेटाचा वापर करून विविध खात्यांमधून सर्व पैसे काढले जातात.
advertisement
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सायबर सेल या घटनेचा पुढील तपास करत आहे.हे. आरटीओकडून चालान आल्याचा भास निर्माण करून फसवणूक करणाऱ्यांनी त्याच्या मोबाईलमध्ये एक फाइल डाउनलोड करा
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
Thane Crime : RTOचा मेसेज पडला महागात! व्हॉट्सअ‍ॅपवरील एका क्लिकने व्यक्तीला 3.2 लाखांना गंडा, नेमकं झालं काय?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement