ठाण्यातील वाहतूक कोंडीची कटकट संपणार, नवी मुंबई ते कल्याण प्रवास सुसाट होणार
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Thane Traffic: नवी मुंबई ते कल्याण प्रवास आता सुसाट होणार आहे. नवीन उन्नत मार्ग होत असून त्यामुळे प्रवाशांच्या प्रवासाचा वेळ वाचणार आहे.
ठाणे: मुंबई, ठाण्यासह नवी मुंबई परिसरात वाहतूक कोंडीचा प्रश्न नेहमीच हैराण करणारा आहे. ठाण्यातील कटाई नाक्याजवळच्या वाहतूक कोंडीने तर वाहनचालक खूप त्रस्त आहेत. आता मात्र वाहनचालकांसाठी आनंदाची बातमी आहे. कटाई नाक्याला राष्ट्रीय महामार्ग – 4 ला जोडणारा 6.71 किलोमीटर लांबीचा उन्नत रस्ता बांधण्यात येणार आहे. एमएमआरडीएने पर्यारवण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडे वन मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवला आहे.
नवी मुंबई, कल्याण -डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यानची कनेक्टिव्हिटी सुधारणे, हाच या नव्या उन्नत कॉरिडॉरचा उद्देश असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी राहणाऱ्यांचा प्रवास सुसाट आणि वाहतूक कोंडीमुक्त होणार आहे. एमएमआरडीएने या मार्गाच्या बांधकामाचे 1982 कोटी रुपयांचे कंत्राट अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला आधीच दिले आहे. हा मार्ग सहा पदरी असणार असून त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल, तसेच प्रादेशिक विकासाला देखील चालना मिळणार आहे.
advertisement
वनविभागाकडे प्रस्ताव
या प्रकल्पात ठाणे जिल्ह्यातील कटाई जंक्शनला पुणे – मुंबई महामार्ग (एनएच- 4) जोडणारा लिंक रोड बांधण्यात येणार आहे. त्यासाठी 0.8325 हेक्टर खारफुटीची जमीन वळवावी लागेल. नव्या मार्गासाठी वन मंजुरीचा प्रस्ताव मंत्रालयाकडे सादर केला आहे. त्यात असे म्हटले आहे की, गेल्या काही दशकांत शहराची लोकसंख्या वाढली आहे. सध्याच्या पायाभूत सुविधांवर खूप ताण आहे. गर्दीच्या वेळी महत्त्वाच्या चौकांत रस्ते अडवणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होतो. याचा व्यवसाय आणि व्याराव अप्रत्यक्ष नकारात्मक परिणाम होत आहे.”
advertisement
कसा असेल उन्नत मार्ग?
view commentsउन्नत कॉरिडॉरचे डिझाइन आणि बांधकाम अफकॉन्स ही कंपनी करत आहे. यात 6 किलोमीटरचा व्हायाडक्ट, भारतीय रेल्वे आणि DFCCIL कॉरिडॉरवर 100 मीटरचा रेल्वे ओव्हरब्रिज, 1.58 किलोमीटरचा प्रवेश रॅम्प आणि 6.32 किलोमीटरचे सेवा रस्ते यांचा समावेश असणार आहे. या प्रकल्पामुळे ऐरोली ते कटाई नाकापर्यंत कटेक्टिव्हिटी सुधारणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या प्रवासाचा वेळ देखील वाचणार असून वाहतूक सुरळीत होईल.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
July 07, 2025 11:35 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
ठाण्यातील वाहतूक कोंडीची कटकट संपणार, नवी मुंबई ते कल्याण प्रवास सुसाट होणार


