आता वीज पडून जीवितहानीचा धोका नाही, सरकारचे मोठे पाऊल, ठाण्यात खास यंत्रणा
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Thane News: सध्याच्या काळात वीज कोसळून जीवितहानीचा धोका वाढला आहे. ते टाळण्यासाठी ठाण्यात खास यंत्रणा बसवण्यात आलीये.
ठाणे: गेल्या काही काळात राज्यावर आस्मानी संकट घोंघावत असून वीज पडण्याच्या घटनांत वाढ झालीये. यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आहे. हीच जीवितहानी टाळण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला असून ठाण्यात 10 ठिकाणी वीज संरक्षण यंत्रणा बसवण्यात आलीये. ही यंत्रणा वीज पडल्याने होणारे नुकसान कमी करण्यासाठी आणि जीवितहानी टाळण्यासाठी देखील उपयुक्त ठरणार आहे.
पावसाळ्यात वीज कोसळून मृत्यूच्या घटनांमध्ये मोठी वाढ होते. जीवितहानी टाळण्यासाठी राज्य सरकारने वीज कोसळण्याची पूर्वसूचना देणारी तसेच आधुनिक वीज संरक्षण यंत्रणा कार्यान्वित केली आहे. त्यासाठी प्रशासनाने वरिष्ठ स्तरावर नवीन यंत्रणांच्या मागणीचा प्रस्ताव सादर केला आहे. सदर प्रस्ताव मान्य झाल्यास इतर ठिकाणी देखील यंत्र बसवण्यात येणार आहेत.
advertisement
काय आहे वीज संरक्षण योजना ?
वीज संरक्षण योजना ही एक सुरक्षा प्रणाली आहे. ती इमारती आणि इतर संरचनेला वीज पडण्यापासून संरक्षण देते. ही यंत्रणा धातूच्या एका विशिष्ट संरचनेत असते. ती विजेला आकर्षित करते आणि जमिनीमध्ये सुरक्षितपणे वळवते. त्यामुळे इमारती आणि नागरिकांना धोका कमी होतो.
वीज संरक्षण यंत्रणा कुठे?
view commentsठाणे जिल्ह्यातील मुरबाड आणि नवी मुंबई हद्दीतील एकूण 10 गावांत ही यंत्रणा बसवण्यात आलीये. मुरबाडमधील न्याहाळी तुळई तर बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली व दिवा या 10 ठिकाणी ही यंत्रणा बसविण्यात आलीये. तर ठाण्यात 4, कल्याण 4, भिवंडी 9, अंबरनाथ 7, उल्हासनगर 7, मुरबाड 3, शहापूर 10, अपर मीरा भाईंदर 3 अशा 48 ठिकाणी वीज संरक्षण यंत्रणा बसविण्यासाठी प्रस्ताव सादर सादर करण्यात आला आहे.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
May 20, 2025 12:25 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
आता वीज पडून जीवितहानीचा धोका नाही, सरकारचे मोठे पाऊल, ठाण्यात खास यंत्रणा


